Monday, 26 July 2021

 *आरोग्य म्हणी*


१. खाल दर रोज गाजर-मुळे,

तर होतील सुंदर तुमचे डोळे... 🥕


२. सकाळी नाश्ता करावा मस्त,

मोड आलेले धान्य करावे फस्त... 🥒


३. डाळी भाजीचे करावे सूप,

अखंड राहील सुंदर रूप.... 🍵


४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,

आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.... 🥒


५. जवळ करा लिंबू संत्री,

दूर होईल पोटातील वाजंत्री... 🍈


६. पपई लागते गोड गोड,

पचनशक्तीला नाही तोड..... 🥑


७.पालेभाज्या घ्या मुखी;

आरोग्य ठेवा सदा सुखी..... 🌿


८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;

आरोग्य धोक्यात आणू नका.... 🧀


९. दररोज एक फळ खावू या;

आरोगयाचे संवर्धन करु या.... 🍎


१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;

थांबवेल आरोग्याचा ह्रास.... 🍏


११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;

आहारात  यांचे  महत्व फार... 🥗


१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;

राहील निरोगी आरोग्याची मौज...🥒


१३. जेवणा नंतर केळी खा;

पाचनशक्तीला वाव द्या....  🍌


१४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका,

मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.... 🍣


१५. खावी रोज रसरशीत फळे;

सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.... 🍑


१६. गालावर खेळते सदा हास्य,

फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य...🥝


१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,

डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...🥕🥑


१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,

प्रथिने तेथे वास करी.. .🍱


१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,

जीवनसत्वांचा नाश करु नका... 🍲


२०. जो घईल सकस आहार,

दूर पळतील सारे आजार.... 🍋


२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,

स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....🍓


२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,

तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....🎋


२३. कळणा कोंडा खावी नाचणी,

मजबूत हाडे कांबी वाणी .

[6/23, 15:25] Kharpatil 1: *रोज 'लवंगा' चे सेवन करा होतील हे फायदे!*


आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी  लवंगाचा केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. चला तर, याचे फायदे जाणून घेऊयात..  


● रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.


● लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.


● कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. .


● हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात.


● दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.


● लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते..

[6/23, 19:21] Kharpatil 1: 🙏के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षाघात (प्यारालिसीस / लकवाच्या रूगणाला 24 तासाच्या आत के.ई.एम.ला घेऊन जाणे) या आजारावर अॉटोमॅटिक या मशीनद्वारे काही तासांतच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

जगभरात काही ठराविक हॉस्पिटलमधे अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे सदर मशीनचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

 💐🙏💐🙏💐🙏💐

कृपया माहीती सर्वाना कळवा, सर्वांचा फायदा होईल...

FORWARDED AS RECEIVED.. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi