Friday, 2 October 2026

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जाणविणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ बाल्यावस्थेतील विकासाशी जोडलेले असल्याचे नमूद

 शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जाणविणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ बाल्यावस्थेतील विकासाशी जोडलेले असल्याचे नमूद करून  केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग अनेक वर्षांपासून या विषयावर कार्यरत असले, तरी अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने परिणामाधारित आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

            मातांमधील रक्तक्षय, कुपोषित बालकांचा जन्म, स्तनपान, लसीकरण आणि पोषणविषयक बाबींचा सातत्याने मागोवा घेणे आवश्यक आहे. विशेषतः आदिवासी भागांत प्रभावी हस्तक्षेपाची गरज असून आऱोग्य व महिला व बालविकाससह आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास यंत्रणेचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.


ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा

 QR कोड स्कॅन करून होणार तपासणी


ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा QR कोड स्कॅन केला जाईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता व इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.

धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल

 ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही ‘आधुनिक’ दर्शन

मुंबई, दि. 2 :  ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना व्यक्त केला. 

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणारे अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले. पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारलेल्या या केंद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी विशेष उद्देश कंपनी अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, तसेच अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी आदी उपस्थित होते.

माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला नागरिकांचा वाढता

 माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, सुमारे दहा लाख नागरिक आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीशी जोडले गेले आहेत. लोकसहभागातून शासकीय आरोग्य योजना अधिक परिणामकारकपणे राबविण्याचे काम आरोग्य विभाग करीत असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले. आऱोग्यविषयक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आयईसी उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाचवी आणि आठवीनंतरची शालेय गळती शून्यावर आणण्यावर भर द्यावा

 पाचवी आणि आठवीनंतरची शालेय गळती शून्यावर आणण्यावर भर द्यावा

- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

            मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पाचवी आणि आठवीनंतरची शालेय गळती शून्यावर आणण्यावर भर दिला. विशेषतः नववी ते बारावीतील मुलींचे शिक्षण अखंड सुरू राहील, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावी. किशोरवयीन गर्भधारणा आणि रक्तक्षय रोखण्यासाठी मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच पोषणविषयक वस्तुस्थिती दर्शविणारी आकडेवारी अचूकपणे नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा नियोजन यंत्रणांना आवश्यक अधिकार देऊन निधी व निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. गरोदर महिला, लहान बालके, अंगणवाडीतील मुले आणि शालेय विद्यार्थ्यांना गरम व ताजा पौष्टिक आहार देण्यावर भर देण्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

 

माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला नागरिकांचा वाढता

 माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, सुमारे दहा लाख नागरिक आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीशी जोडले गेले आहेत. लोकसहभागातून शासकीय आरोग्य योजना अधिक परिणामकारकपणे राबविण्याचे काम आरोग्य विभाग करीत असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले. आऱोग्यविषयक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आयईसी उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वन साइज फिट्स ऑल’ पद्धत नको

 वन साइज फिट्स ऑल’ पद्धत नको

            कुपोषणासह बाल्यावस्थेतील विविध समस्यांवर एकच उपाय सर्व ठिकाणी लागू होऊ शकत नाही. स्थानिक परिस्थिती, उपलब्ध साधने, समाजाची जीवनपद्धती, आहाराच्या सवयी आणि स्थानिक चालीरीती लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागतील. काही हस्तक्षेप सर्वत्र समान असतील; मात्र स्थानिक गरजेनुसार काही बाबतीत आवश्यक लवचिकता ठेवावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

            पोषणासाठी दिल्या जाणाऱ्या उपाययोजना प्रत्यक्षात वापरल्या जात आहेत का, याचाही आढावा घेणे आवश्यक आहे. स्थानिक समाजाच्या चवीला आणि सवयींना अनुरूप असलेल्या पारंपरिक पोषणपद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबी पुन्हा वापरात आणण्याची गरज आहे. पोषणविषयक पाककृती आणि उपाययोजनांमध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi