पाचवी आणि आठवीनंतरची शालेय गळती शून्यावर आणण्यावर भर द्यावा
- मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पाचवी आणि आठवीनंतरची शालेय गळती शून्यावर आणण्यावर भर दिला. विशेषतः नववी ते बारावीतील मुलींचे शिक्षण अखंड सुरू राहील, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावी. किशोरवयीन गर्भधारणा आणि रक्तक्षय रोखण्यासाठी मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच पोषणविषयक वस्तुस्थिती दर्शविणारी आकडेवारी अचूकपणे नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा नियोजन यंत्रणांना आवश्यक अधिकार देऊन निधी व निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. गरोदर महिला, लहान बालके, अंगणवाडीतील मुले आणि शालेय विद्यार्थ्यांना गरम व ताजा पौष्टिक आहार देण्यावर भर देण्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment