Tuesday, 15 September 2026

शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि सर्वेक्षण अहवालांच्या आधारे

 शाळा भेटीदरम्यान शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची स्थिती, शाळा व परिसराची स्वच्छता, क्रीडांगण व संरक्षक भिंत, वीज, आवश्यक फर्निचर, ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश, पोषण आहाराची गुणवत्ता व वेळेवर वितरण आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारणांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच संबंधित पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

            निपुण महाराष्ट्र अभियान, विद्यार्थी गुणवत्ता, पॅट, यूडायस प्लस, पीजीआय इंडेक्स, एसडीजी गोल, पीएम श्री शाळा, आदर्श शाळा, पीएम पोषण योजना, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा, महास्कूल जीआयएस आदी विविध शैक्षणिक उपक्रम व योजनांच्या अंमलबजावणीचाही या भेटींमध्ये आढावा घेण्यात आला.

 

            अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पालक अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी यांनी साधारणत: 150 शाळा भेटी करुन शालेय प्रशासन, गुणवत्ता व शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन केले. अभियानाचा दुसरा टप्पा दि. 2223 सप्टेंबर, 2026 रोजी असून त्यामध्ये सुद्धा शाळा भेटी, तालुका व जिल्हास्तरीय आढावा बैठका आणि आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध

 विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा

उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध

-शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

 ‘चला शाळेत जाऊयाअभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            मुंबई, दि. ११ - राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने चला शाळेत जाऊया अभियानराबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याअंतर्गत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील शाळांना भेट दिली. तसेच संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्यासमवेत शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना, शैक्षणिक व प्रशासकीय बाबी आदींबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले.

 

            ‘चला शाळेत जाऊयाअभियानाच्या माध्यमातून शाळेच्या दारापर्यंत पोहोचून, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे.

 

            अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी विभागातील सहसंचालक व उपसंचालक यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्त जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यांना भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्या दिवशी संबंधित जिल्ह्यातील तालुक्यांना भेट देऊन किमान दोन शाळांचा प्रत्यक्ष शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेण्यात आल्या.

 

            राज्याच्या संतुलित, सर्वांगिण विकासासाठी १० जिल्ह्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या १० जिल्ह्यांपैकी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी जालना जिल्ह्याचे, शालेय शिक्षण आयुक्त यांनी गडचिरोली जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यांनी पालघर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित सात विस्तारित आकांक्षित जिल्ह्यांसाठी राज्यस्तरीय शिक्षण संचालक यांची शिक्षण विभागाचे पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कामांबाबत आढावा घेतला.

 

राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके 'मीटिंग ऑफ माईंडस' बैठक संपन्न · शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय बैठकीत बसून परवीन सुलतान यांचे गायन ऐकले

 राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके 'मीटिंग ऑफ माईंडस' बैठक संपन्न

·         शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय बैठकीत बसून परवीन सुलतान यांचे गायन ऐकले

 

मुंबई, दि. ११ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट यूथ (स्पिक-मॅके) या संस्थेच्या  पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक (मिटिंग ऑफ माइंड्स) लोकभवन येथे झाली. 

            स्पिक मॅके ही विद्यार्थी व युवकांना भारताच्या संस्कृतीशी जोडण्याचे काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेचे कार्य आज अधिक प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            आपण एका संगीत प्रेमी घराण्यातून आलो असून स्पिक मॅके व इंटॅच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून जुळलो असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या दोन संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            १९७७ मध्ये स्थापन झालेल्या स्पिक मॅके संस्थेचे मुख्य आश्रयदाते होण्याचे मान्य केल्याबद्दल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर यांनी राज्यपालांचे आभार मानले. पुढील वर्षी २०२७ साली स्पिक मॅके स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून आयआयटी दिल्ली येथे व त्यानंतर आयआयटी मुंबई येथे सुवर्ण महोत्सवी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

            शास्त्रीय संगीत व नृत्य विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवते. आज मुलांची व पालकांचीही बुद्धी चंचल झाली असल्याचे सांगून आपण मुलांना जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी पुरेसे तयार करीत नसल्याचे निरीक्षण संस्थेचे संस्थापक डॉ किरण सेठ यांनी नोंदवले.

            स्पिक मॅके मुलांची व युवकांच्या सृजनात्मक शक्तीला शास्त्रीय कलांच्या माध्यमातून चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            बैठकीला उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, संजय कुमार यादव, सुशील कुमार जीवराजका, माया शहानी, सूचित नंदा, योगेश आंधळे, ममता भट्टाचार्य, आदी उपस्थित होते.

            बैठकीनंतर दरबार हॉल येथे राज्यपालांच्या उपस्थित झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन ऐकले. सर्व मुलांनी भारतीय बैठकीत बसून गायन ऐकले. परवीन सुलताना यांना मुकुंदराज देव (तबला) व श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

0000

घरगुती गणपती वर्षा कांबळे, विरार


 

यंग इंजिनिअर्स अवॉर्ड्स २०२६’

 यंग इंजिनिअर्स अवॉर्ड्स २०२६ने सीएसआयआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च, धनबादचे डॉ. देबाशीष मिश्रा, एनआयटी रायपूरचे सहायक प्राध्यापक डॉ. आशीष कुमार विश्वकर्मा आणि ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, पश्चिम बंगालचे व्यवस्थापक (मायनिंग) डॉ. अली मुर्तझा शेख यांचा गौरव करण्यात आला. ही परिषद दोन दिवस असून देशातील नामवंत  अभियंते , अभ्यासक  व सशोधक सादरीकरण करणार आहे.

 

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक,माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ संकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

  • माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीसंकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 

            मुंबई, दि. ११      : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्‍युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

            एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेवर आधारित आहे.

 

            यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रृत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

            माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून, त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

            यंदाच्या माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Monday, 14 September 2026

मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ ही केवळ अधिवेशनाची संकल्पना नसून

 अधिवेशनाचे संयोजक डॉ. अनुपम खेर यांनी मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ ही केवळ अधिवेशनाची संकल्पना नसून राष्ट्रीय प्रेरणा असल्याचे सांगितले. कोळसा, लोहखनिज आणि चुनखडीची वाढती मागणी पूर्ण करतानाच लिथियम, ग्रेफाइट यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांची वाढती गरज पूर्ण करणे, तसेच तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सुरक्षितता यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशभरातून सुमारे ३०० प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी झाले असून, ४० तांत्रिक संशोधन निबंध सादर करण्यात येणार आहेत. प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञान, उतार निरीक्षण, डिजिटायझेशन, एआयचा वापर, इंटेलिजंट मायनिंग, खाण बंद प्रक्रिया, सर्क्युलर इकॉनॉमी, ऊर्जा कार्यक्षमता आणि महत्त्वपूर्ण खनिजे या विषयांवर विविध सत्रे होणार आहेत.

Featured post

Lakshvedhi