Saturday, 12 September 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

                                                       :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

                मुंबई, दि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी 'पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवती, उद्योजक तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

                रोजगार महाकुंभ हा राज्यव्यापी उपक्रम असून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तो राबविण्यात येत आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक-युवतींनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनेने रिक्त पदांची नोंदणी करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.

                मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रस्तावित रोजगार मेळाव्यांची ठिकाणे १. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, जोगेश्वरी पूर्व, मुंबई  ४०००६०,२. एआयसीएमईयूज् प्रायव्हेट आयटीआय, ट्रॉम्बे, मानखुर्द पूर्व, मुंबई ४०००८८  ३. द चिल्ड्रेन्स एड सोसायटी आयटीआय, मानखुर्द पूर्व, मुंबई  ४०००८८  ४. सॅपिओ ॲनालिटिक्स, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०, ५. नवजीवन पॉलिटेक्निक, भांडुप पश्चिम, मुंबई  ४०००७८ ६. सोबती फाउंडेशन मुंबई, इंदिरानगर, कांजूरमार्ग पूर्व,  ७. क्वास्टेक, बोरिवली पश्चिम, मुंबई  ४०००९२  ८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  ९. झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  १०. ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७०  ११. के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, विद्याविहार पूर्व, मुंबई  ४०००७७  १२. श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) १३. बीई३ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर पश्चिम, मुंबई  ४०००८९  १४. असॉर्ट १ कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई  ४०००७२  १५. द बॉम्बे स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, अंधेरी पूर्व, मुंबई  ४०००९३  १६. एलए टेक्नॉलॉजीज, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे पूर्व, मुंबई  ४०००५१  १७. उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई  ४०००४९  १८. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय, कामा लेन, घाटकोपर पश्चिम   येथे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत तरी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी करावी. मेळाव्याला उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेंद्र भगत यांनी केले आहे.

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 मुंबई शहराच्या विविध छटाटिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी

एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १२ : मुंबईची वैविध्यपूर्ण जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रातून मांडण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पर्यटनअंतर्गत मुंबई शहराच्या विविध छटाया विषयावर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

            मुंबईतील संस्कृती, उत्सव, वारसा, निसर्ग, व्यक्ती, वास्तुकला आणि दैनंदिन जीवनातील अनुभव छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्जनशीलपणे सादर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मुंबईतील केवळ प्रसिद्ध स्थळांपुरते मर्यादित न राहता शहरातील विविध पैलू, कथा, भावना आणि अनुभव वेगळ्या दृष्टिकोनातून एका छायाचित्रात मांडण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.प्रत्येक स्पर्धकाला विषयाशी संबंधित एक मूळ छायाचित्र सादर करता येईल. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशन   जेपीईजी व जेपीजी स्वरूपात आणि कमाल १० एमबी आकाराचे असावे. किरकोळ स्वरूपातील संपादनास परवानगी असेल; मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेली छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. छायाचित्रावर कोणताही मजकूर, बॉर्डर, लोगो किंवा वॉटरमार्क नसावा.

स्पर्धकांनी छायाचित्रासोबत ते स्पर्धेच्या विषयाशी कसे संबंधित आहे, याचे थोडक्यात वर्णन द्यावे. प्रवेशिका सहभागीचे नाव आणि संपर्क तपशीलांसह mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.प्राप्त प्रवेशिकांची स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राथमिक छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र छायाचित्रांचे एमटीडीसीने नियुक्त केलेल्या परीक्षकांमार्फत मूल्यमापन केले जाईल. विषयाशी संबंधितता, नावीन्य, रचना, तांत्रिक गुणवत्ता आणि एकूण प्रभाव आदी निकषांचा मूल्यमापनात विचार केला जाईल. छायाचित्रातून मुंबईची कथा, भावना अथवा वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे सादर करण्याला विशेष महत्त्व दिले जाईल.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच पात्र प्रवेशिकांसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांचा एमटीडीसीतर्फे अधिकृत समारंभात गौरव करण्यात येईल.स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क एमटीडीसीकडे राहतील. या छायाचित्रांचा मुंबई पर्यटनाचा प्रचार, प्रकाशने आणि अन्य संबंधित प्रयोजनांसाठी वापर केला जाऊ शकतो. अशा वापराच्या वेळी लागू असल्यास संबंधित छायाचित्राच्या कॉपीराइट धारकाला योग्य श्रेय देण्यात येईल.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश आर. गटणे म्हणाले की, मुंबई हे असंख्य कथा आणि अनुभवांनी समृद्ध असे शहर आहे. प्रत्येक अनुभव मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची वेगळी झलक दाखवतो. या स्पर्धेच्या माध्यमातून छायाचित्रप्रेमींनी आपल्या सर्जनशील नजरेतून हे क्षण टिपावेत आणि मुंबईची विविध रूपे जगासमोर आणावीत, असे आमचे आवाहन आहे.अधिक माहितीसाठी 94257-17529 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल से बच्चों के चेहरों पर खिलेगी मुस्कान दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों को मिलेंगे निःशुल्क समग्र उपचार राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और ‘स्माइल ट्रेन इंडिया’ के बीच तीन वर्ष का समझौता ज्ञापन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल से बच्चों के चेहरों पर खिलेगी मुस्कान

दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों को मिलेंगे निःशुल्क समग्र उपचार

राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और स्माइल ट्रेन इंडियाके बीच तीन वर्ष का समझौता ज्ञापन

मुंबई, दिनांक 12 : प्रत्येक बच्चे के चेहरे पर मुस्कान खिले और उसका जीवन आनंदमय बने, इस उद्देश्य से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना के तहत दुभंगले हुए होंठ और तालू (Cleft Lip and Palate) जैसे जन्मजात विकार से पीड़ित बच्चों को अब गुणवत्तापूर्ण और समग्र उपचार निःशुल्क उपलब्ध कराया जाएगा।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और स्माइल ट्रेन इंडियाके बीच इस संबंध में समझौता ज्ञापन किया गया है। यह समझौता तीन वर्षों के लिए प्रभावी रहेगा।

जन्मजात रूप से दुभंगले हुए होंठ और तालू के कारण कई मासूम बच्चों के चेहरे की मुस्कान फीकी पड़ जाती है। अपने बच्चे के चेहरे पर एक बार फिर मुस्कान देखने के लिए माता-पिता की चिंता और उपचार के लिए अस्पतालों के चक्कर लगाने की स्थिति बेहद पीड़ादायक होती है। इसके अलावा, इस विकार के उपचार का खर्च अधिक होने के कारण यह प्रत्येक अभिभावक के लिए वहन करना संभव नहीं होता। इस स्थिति को समझते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दूरदर्शी दृष्टिकोण अपनाते हुए ऐसे अभिभावकों को बड़ी राहत प्रदान की है। राज्य का कोई भी बच्चा दुभंगले हुए होंठ और तालू के साथ उपचार से वंचित न रहे, यह सुनिश्चित करने के लिए इस पहल के माध्यम से प्रयास किए जाएंगे।

इस समझौता ज्ञापन के तहत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) के अंतर्गत जांच के दौरान पाए गए बच्चों को जिला नोडल अधिकारियों के औपचारिक रेफरल पत्र के माध्यम से स्माइल ट्रेन इंडियाके मान्यता प्राप्त अस्पतालों में उपचार के लिए भेजा जाएगा। संबंधित जिलों को निर्धारित भागीदार अस्पतालों से जोड़ने के लिए दोनों संस्थाएं समन्वय के साथ कार्य करेंगी।

दुभंगले हुए होंठ और तालू के उपचार के संबंध में अधिक जानकारी के लिए 18001038301 हेल्पलाइन नंबर पर संपर्क करने की अपील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की है।

इस पहल के अंतर्गत बच्चों को सर्जरी, अस्पताल में भर्ती एवं ठहरने, दवाइयां, पोषण संबंधी सेवाएं, दंत चिकित्सा, वाक् चिकित्सा तथा आवश्यकता के अनुसार यात्रा की सुविधा निःशुल्क उपलब्ध कराई जाएगी। मरीजों के भोजन, आवास और यात्रा का खर्च भी स्माइल ट्रेन इंडियाद्वारा वहन किया जाएगा। सर्जरी से पहले की जांच तथा उपचार से संबंधित सर्जरी के बाद होने वाली जटिलताओं का खर्च भी संस्था द्वारा वहन किया जाएगा।

बच्चों की पहचान और उपचार की आवश्यकता सुनिश्चित करने के लिए स्माइल ट्रेनके भागीदार अस्पतालों, RBSK टीमों और जिला प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रों (DEIC) के समन्वय से जांच शिविर आयोजित किए जाएंगे। दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों की पहचान करने के संबंध में सरकारी स्वास्थ्य कर्मचारियों को आवश्यक प्रशिक्षण और मार्गदर्शन भी प्रदान किया जाएगा।

उपचार के लिए मरीजों को रेफर करने, उनका रिकॉर्ड रखने तथा जिला नोडल अधिकारियों के साथ समन्वय के लिए प्रत्येक मान्यता प्राप्त अस्पताल का परियोजना निदेशक नोडल अधिकारी के रूप में कार्य करेगा। संबंधित जिले के जिला सर्जन सर्जरी से पहले अस्पताल में ऑपरेशन थिएटर की सुविधाओं और एनेस्थीसिया विशेषज्ञों की उपलब्धता सुनिश्चित करेंगे।

राज्य के इन 15 अस्पतालों में होंगे उपचार

इस समझौते के तहत राज्य के 15 मान्यता प्राप्त अस्पतालों में इस विकार के उपचार की सुविधा उपलब्ध कराई जाएगी-

  1. आचार्य विनोबा भावे ग्रामीण अस्पताल, वर्धा
  2. आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर
  3. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जलगांव
  4. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपति संभाजीनगर
  5. एलीट कॉस्मो क्लिनिक एंड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापुर
  6. लहाने हॉस्पिटल, लातूर
  7. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई
  8. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे
  9. पूना हॉस्पिटल, पुणे
  10. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया
  11. श्रीराम हॉस्पिटल, अकोला
  12. शुश्रूषा सिटिजन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई
  13. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपुर
  14. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक
  15. वेस्टर्न इंडिया इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेस (WINS), कोल्हापुर।

कार्यक्रम की प्रगति की नियमित समीक्षा के लिए दोनों संस्थाओं के प्रतिनिधियों की एक संयुक्त समिति गठित की जाएगी। साथ ही, स्वास्थ्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के निदेशक के माध्यम से इस परियोजना का नियमित तृतीय-पक्ष मूल्यांकन किया जाएगा।

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

                                                       :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

                मुंबई, दि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी 'पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवती, उद्योजक तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

                रोजगार महाकुंभ हा राज्यव्यापी उपक्रम असून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तो राबविण्यात येत आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक-युवतींनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनेने रिक्त पदांची नोंदणी करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.

                मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रस्तावित रोजगार मेळाव्यांची ठिकाणे १. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, जोगेश्वरी पूर्व, मुंबई  ४०००६०,२. एआयसीएमईयूज् प्रायव्हेट आयटीआय, ट्रॉम्बे, मानखुर्द पूर्व, मुंबई ४०००८८  ३. द चिल्ड्रेन्स एड सोसायटी आयटीआय, मानखुर्द पूर्व, मुंबई  ४०००८८  ४. सॅपिओ ॲनालिटिक्स, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०, ५. नवजीवन पॉलिटेक्निक, भांडुप पश्चिम, मुंबई  ४०००७८ ६. सोबती फाउंडेशन मुंबई, इंदिरानगर, कांजूरमार्ग पूर्व,  ७. क्वास्टेक, बोरिवली पश्चिम, मुंबई  ४०००९२  ८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  ९. झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  १०. ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७०  ११. के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, विद्याविहार पूर्व, मुंबई  ४०००७७  १२. श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) १३. बीई३ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर पश्चिम, मुंबई  ४०००८९  १४. असॉर्ट १ कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई  ४०००७२  १५. द बॉम्बे स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, अंधेरी पूर्व, मुंबई  ४०००९३  १६. एलए टेक्नॉलॉजीज, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे पूर्व, मुंबई  ४०००५१  १७. उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई  ४०००४९  १८. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय, कामा लेन, घाटकोपर पश्चिम   येथे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत तरी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी करावी. मेळाव्याला उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेंद्र भगत यांनी केले आहे.

000

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 मुंबई शहराच्या विविध छटाटिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी

एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १२ : मुंबईची वैविध्यपूर्ण जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रातून मांडण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पर्यटनअंतर्गत मुंबई शहराच्या विविध छटाया विषयावर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

            मुंबईतील संस्कृती, उत्सव, वारसा, निसर्ग, व्यक्ती, वास्तुकला आणि दैनंदिन जीवनातील अनुभव छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्जनशीलपणे सादर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मुंबईतील केवळ प्रसिद्ध स्थळांपुरते मर्यादित न राहता शहरातील विविध पैलू, कथा, भावना आणि अनुभव वेगळ्या दृष्टिकोनातून एका छायाचित्रात मांडण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.प्रत्येक स्पर्धकाला विषयाशी संबंधित एक मूळ छायाचित्र सादर करता येईल. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशन   जेपीईजी व जेपीजी स्वरूपात आणि कमाल १० एमबी आकाराचे असावे. किरकोळ स्वरूपातील संपादनास परवानगी असेल; मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेली छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. छायाचित्रावर कोणताही मजकूर, बॉर्डर, लोगो किंवा वॉटरमार्क नसावा.

स्पर्धकांनी छायाचित्रासोबत ते स्पर्धेच्या विषयाशी कसे संबंधित आहे, याचे थोडक्यात वर्णन द्यावे. प्रवेशिका सहभागीचे नाव आणि संपर्क तपशीलांसह mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.प्राप्त प्रवेशिकांची स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राथमिक छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र छायाचित्रांचे एमटीडीसीने नियुक्त केलेल्या परीक्षकांमार्फत मूल्यमापन केले जाईल. विषयाशी संबंधितता, नावीन्य, रचना, तांत्रिक गुणवत्ता आणि एकूण प्रभाव आदी निकषांचा मूल्यमापनात विचार केला जाईल. छायाचित्रातून मुंबईची कथा, भावना अथवा वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे सादर करण्याला विशेष महत्त्व दिले जाईल.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच पात्र प्रवेशिकांसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांचा एमटीडीसीतर्फे अधिकृत समारंभात गौरव करण्यात येईल.स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क एमटीडीसीकडे राहतील. या छायाचित्रांचा मुंबई पर्यटनाचा प्रचार, प्रकाशने आणि अन्य संबंधित प्रयोजनांसाठी वापर केला जाऊ शकतो. अशा वापराच्या वेळी लागू असल्यास संबंधित छायाचित्राच्या कॉपीराइट धारकाला योग्य श्रेय देण्यात येईल.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा

  पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा व बांधकाम प्रकल्पांची कामांची सद्यस्थिती तपासून पहा. शैक्षणिक इमारती, रुग्णालये तसेच वसतिगृहांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर, वरूड, उदगीर, मोर्शी येथील समावेश आहे या कामांचे प्रगतीनिहाय अहवाल करून ही कामे गतीने करा अशा सूचना त्यांनी केल्या.

विद्यार्थ्यांचे विद्यावेतन व इंटर्नशिप भत्ता तसेच पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व बांधकाम प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवावे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

000

माफसू’च्या विकासकामांना गती देण्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश · शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन व शुल्क संरचनेचा घेतला आढावा मुंबई

 माफसूच्या विकासकामांना गती देण्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

·  शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन

व शुल्क संरचनेचा घेतला आढावा

            मुंबई : पशुवैद्यक विज्ञान व पशुसंवर्धन पदवी (बीव्हीएससी अँड एएच) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांप्रमाणे १८ हजार रुपये विद्यावेतन करण्याच्या प्रस्तावानुसार ४ कोटी १२ लाख रूपयाची तरतुद करण्याबाबतच्या प्रस्तावाला आगामी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता घेण्यासाठी कारावी. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांना हॉस्टेलसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या (माफसू) शैक्षणिक, प्रशासकीय तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा पशू व मत्स्य संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये,कुलसचिव मोना ठाकूर,उपकुलसचिव डॉ.ए.पी.गांवडे, सहसचिव नि.भा.मराळे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi