आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक
'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन
सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनविण्याची गरज
मुंबई, दि. ५ : जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी काही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. समान मूल्यांचा शोध घेत, सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढविणे आजची गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्य नव्हे, तर मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातूनच अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
L