Thursday, 13 August 2026

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा -

 महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरउपक्रमात

सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई,दि. १३ : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 

            जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआरआधारित ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. तसेच २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

२०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत

 २०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरमध्ये एकीकडे स्वच्छ सुंदर व वातानुकूलित मेट्रोचा प्रवास आहे तर दुसरीकडे कष्टप्रद वाटत असणारा लोकलचा प्रवास आहे. यामधील तफावत लवकरच दूर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये येणार असून मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील.

मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार

 मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुंबईकरांच्या सेवेत २०२७ मध्ये मेट्रो सारख्या उपनगरीय लोकल ट्रेन*

·         भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन या सांताक्रुज - चेंबूर जोडमार्ग टप्पा दोन उन्नत मार्गिकेचे लोकार्पण

·         चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण

·         ठाणे ते बोरिवली दुहेरी मार्गाच्या प्रकल्पातील 'टीबीएम अर्जुना'चा शुभारंभ

·         माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण

 

मुंबई, दि. १३: केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रो सारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुंबई महानगराच्या दळणवळणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला 'गतिमानतेचा बूस्टर' मिळाला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

सह्याद्री अतिथी गृह येथे दूरदृष्य प्रणाली द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू

 लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू

- राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील विविध घटकांची साथ आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करता येईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

 

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की, केंद्र किंवा राज्य शासन एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोगमुक्त भारत अभियानाशी संबंधित निक्षय मित्रउपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निक्षय मित्र झाले असून, अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. क्षयरुग्णांना औषधांसह आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र योगदान देत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती आणि पीसीओडीसाठी स्वतंत्र दवाखाने सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पीसीओडीमुळे अनेक किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्वाचा ठरत आहे.

 


टीबी’मुक्त महाराष्ट्रासाठी उद्योगांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा

 टीबी’मुक्त महाराष्ट्रासाठी उद्योगांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

·         टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद

 

मुंबई, दि. १३ : टीबीमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शासन आणि उद्योगांनी हातात हात घालून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

 

ताज प्रेसिडेंट येथे आयोजित टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६ अंतर्गत धोरणात्मक कॉर्पोरेट भागीदारीद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात मंत्री आबिटकर बोलत होते.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री आबिटकर म्हणाले की, टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभियान राबवत आहेत. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येईल. त्यासाठी सीएसआर हा महत्वाचा पर्याय ठरू शकतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सातत्याने विविध आरोग्य अभियान राबविण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक आजाराच्या तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तपासणी आणि उपचारांविषयीची भीती, आजारामुळे स्वतःला आणि कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची चिंता यामुळे ते तपासणी टाळतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे आहे.

 

विशेषतः शहरांमध्येही टीबीबाबत जनजागृतीवर अधिक भर द्यावा. आजाराचे निदान उशिरा होण्यापेक्षा नागरिकांना वेळेत तपासणीसाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले; या कामाला अपेक्षित गती देण्यासाठी सर्व संबंधित कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पोलिओ, कोरोना आणि एड्सविरोधातील मोहिमांचा अनुभव पाहता मिशन मोडवर काम केल्यास आरोग्यविषयक अभियान यशस्वी होऊ शकते. त्याच धर्तीवर टीबीविरोधात लक्ष्यित तपासणी करून आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्यास महाराष्ट्राच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण काम करता येईल. टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी शासन आणि उद्योगांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची सुरुवात या कार्यक्रमातून करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

अशा प्रकारचे कार्यक्रम आणि शासन- कॉर्पोरेट उद्योग संवाद सातत्याने व्हायला हवेत. अभियानाला गती देण्यासाठी सर्वांचा  पुढाकार लाभल्याने मंत्री आबिटकर यांनी आभार व्यक्त केले.

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक

 चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक

- उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबई, दि. 13 : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे उद्योजक व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.

 

चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होत आहे. रस्त्यांच्या समस्येमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्याचा रोजगारावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

 

उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस मार्ग काढण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रस्ते, वाहतूक तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार

 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार

यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या दरम्यान जलप्रशुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना याबाबत सामंजस्य कराराचे माझगाव डॉकचे संचालक कॅप्टन वासुदेव पुराणिक आणि एमडब्लूआरआरएच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे यांनी हस्ताक्षर केले.  

यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, जल नियमन प्राधिकरण 2005 मध्ये स्थापन झाले पण प्रत्यक्षात 2015 पासून त्याचे काम सुरू झाले आणि एकात्मिक जल आराखडा तयार करण्यासाठी पाऊल टाकले गेले पहिला आराखडा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा करण्यात आला महाराष्ट्राच्या जवळपास 50% नद्या व उपनद्या या गोदावरी खोऱ्यामध्ये येत आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, देशातील पहिला जल आराखडा महाराष्ट्राने तयार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यास मूर्त स्वरूप देताना कार्यवाही सुरू केली . 2018 मध्ये जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याचा उद्देश शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविणे हा आहे.

प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्वेताली ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एमडब्लूआरआरए प्राधिकरणाच्या विविध अहवाल, स्मरणिका आणि माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राधिकरणाच्या जलतज्ञांचा आणि माजी अध्यक्ष सदस्य यांचा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त परिसंवाद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

0000

Featured post

Lakshvedhi