Saturday, 11 July 2026

महिलाएँ केवल सहभागी नहीं, परिवर्तन की अग्रदूत हैं :

 महिलाएँ केवल सहभागी नहीं, परिवर्तन की अग्रदूत हैं : अनुप्रिया पटेल

इस अवसर पर केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल ने कहा कि आज महिलाएँ जमीनी स्तर से लेकर उद्योग जगत की सर्वोच्च जिम्मेदारियाँ सफलतापूर्वक निभा रही हैं। वे विकास प्रक्रिया में केवल भागीदार ही नहीं, बल्कि परिवर्तन का नेतृत्व भी कर रही हैं।

उन्होंने केंद्र सरकार द्वारा महिला सशक्तीकरण के लिए किए जा रहे विभिन्न प्रयासों की जानकारी देते हुए कहा कि मातृ स्वास्थ्य में सुधार तथा मातृ मृत्यु दर में कमी लाने के लिए भारत के प्रयासों को वैश्विक स्तर पर सराहना मिली है। उन्होंने 'नारी शक्ति वंदन अधिनियम' तथा 'पोषण अभियान' जैसी महत्वपूर्ण पहलों का उल्लेख किया।

उन्होंने बताया कि महिलाओं को गर्भाशय ग्रीवा (सर्वाइकल) कैंसर से बचाने के लिए केंद्र सरकार द्वारा एचपीवी वैक्सीन उपलब्ध कराई जा रही है। इसके साथ ही उन्होंने आयुष्मान भारत, जन औषधि केंद्र, लखपति दीदी तथा नमो ड्रोन जैसी योजनाओं की भी जानकारी दी।

कार्यक्रम की शुरुआत राज्यपाल द्वारा 'फॉर्च्यून इंडिया' पत्रिका के नवीनतम अंक के विमोचन से हुई। आरपी संजीव गोयनका समूह के उपाध्यक्ष शाश्वत गोयनका ने स्वागत भाषण दिया, जबकि 'फॉर्च्यून इंडिया' के प्रधान संपादक सौरव मजूमदार ने धन्यवाद ज्ञापित किया।

उद्घाटन सत्र में नेशनल स्टॉक एक्सचेंज के मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान, रिलायंस फाउंडेशन की अध्यक्षा नीता अंबानी, पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी, एज़ेडबी एंड पार्टनर्स की सह-संस्थापक जिया मोदी, नीरजा बिड़ला सहित उद्योग, व्यापार और बैंकिंग क्षेत्र की अनेक प्रतिष्ठित एवं प्रभावशाली महिलाएँ उपस्थित थीं।

फॉर्च्यून इंडिया 100 मोस्ट पावरफुल वुमेन' सम्मान समारोह महिला स्वयं सहायता समूहों ने देश में क्रांति लाई है :

 फॉर्च्यून इंडिया 100 मोस्ट पावरफुल वुमेन' सम्मान समारोह

महिला स्वयं सहायता समूहों ने देश में क्रांति लाई है : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नीता अंबानी, स्मृति ईरानी, जिया मोदी और नीरजा बिड़ला की उपस्थिति


            मुंबई दि.11 : महिला स्वयं सहायता समूहों ने देश में महिलाओं के सामाजिक, आर्थिक और राजनीतिक सशक्तीकरण को नई गति प्रदान की है तथा ग्रामीण और आदिवासी महिलाओं के जीवन में क्रांतिकारी परिवर्तन लाए हैं। गांव-गांव की महिलाओं में नेतृत्व क्षमता विकसित हो रही है। यह कार्य और अधिक प्रभावी बनाने के लिए समाज के अंतिम व्यक्ति तक पहुँचना आवश्यक है। यह बात महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहाँ कही।

'फॉर्च्यून इंडिया 100 मोस्ट पावरफुल वुमेन' सम्मान समारोह का शुभारंभ 10 जुलाई को मुंबई में राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में हुआ। इस अवसर पर वे उपस्थित जनसमूह को संबोधित कर रहे थे।

कार्यक्रम में केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल भी उपस्थित थीं। इस अवसर पर राज्यपाल ने 'फॉर्च्यून इंडिया' पत्रिका के नवीनतम अंक का विमोचन किया।

विभिन्न क्षेत्रों में नेतृत्व कर रही महिलाओं को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि स्वयं सहायता समूहों के माध्यम से अनेक महिलाओं ने अपने जीवन में सकारात्मक परिवर्तन लाया है तथा वे अन्य महिलाओं के लिए भी प्रेरणा का स्रोत बनी हैं।

उन्होंने त्रिपुरा की एक ग्रामीण महिला का उदाहरण देते हुए कहा कि जो महिला कभी बैंक जाने से भी हिचकिचाती थी, वही बाद में अधिकारियों के समक्ष पूरे आत्मविश्वास के साथ पावर-पॉइंट प्रस्तुति देने लगी। आज वह 'बैंक सखी' के रूप में अनेक महिलाओं को वित्तीय सेवाओं से जोड़ने का कार्य कर रही है। उन्होंने कहा कि महिलाओं को दिए गए ऋणों में अनुत्पादक परिसंपत्तियों (एनपीए) का प्रतिशत एक प्रतिशत से भी कम है। महिलाओं के हाथों में दिया गया धन सुरक्षित रहता है।

राज्यपाल ने कहा कि देश की लगभग 50 प्रतिशत आबादी महिलाएँ हैं। उनके विकास की उपेक्षा करके 'विकसित भारत' का लक्ष्य प्राप्त नहीं किया जा सकता। इसलिए समाज के अंतिम पायदान पर खड़ी महिला तक पहुँचकर उसका सशक्तीकरण सुनिश्चित करना समय की आवश्यकता है।

महिला केवळ परिवर्तनाच्या अग्रस्थानी

 महिला केवळ परिवर्तनाच्या अग्रस्थानी : अनुप्रिया पटेल

 

            आज महिला तळागाळापासून तर उद्योग जगतातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत.   विकास प्रक्रियेत त्या केवळ सहभागी होत नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली.  मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगून त्यांनी 'नारीशक्ती वंदन' अधिनियम व 'पोषण अभियान' उपक्रमाची माहिती दिली.
            गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे एचपीव्ही लस देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी 'आयुष्मान भारत' योजना, 'जनऔषधी औषधालये, लखपती दीदी, नमो ड्रोन आदी योजनांची माहिती दिली.

            सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.  आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले तर  'फॉर्च्युन इंडिया'चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी आभारप्रदर्शन केले.

उदघाटन सत्राला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान'

 १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान'

नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती  

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

            मुंबई दि.11 : महिला स्वयंसहायता गटांमुळे  देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण - आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

            'फॉर्च्युन इंडिया' मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या 'फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन (सर्वाधिक प्रभावी महिला)' पुरस्काराचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जुलै रोजी मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

            केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
विविध क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या महिलांना संबोधित करताना, राज्यपाल म्हणाले की, महिला स्वयंसहायता गटांमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून इतरांना देखील प्रोत्साहन देणाऱ्या महिला अनेक ठिकाणी उदयास आल्या आहेत.

पूर्वी बँकेत जाण्यास देखील घाबरणाऱ्या त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेने कालांतराने स्वतः अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले त्यावेळी सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले होते. ती महिला 'बँक सखी' म्हणून आज अनेक महिलांना मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) टक्क्यापेक्षाही कमी आहे. महिलांकडे गेलेला पैसे सुरक्षित असतो, असे त्यांनी सांगितले.

देशातील ५० टक्के नागरिक महिला असल्यामुळे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून 'विकसित भारता'चे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलेपर्यंत पोहोचून तिचे सक्षमीकरण झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन यात्रेची इच्छापूर्ती होते याचा मनस्वी आनंदनागपूर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ

 ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन यात्रेची इच्छापूर्ती होते याचा मनस्वी आनंद

                                                  -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø नागपूर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ

 नागपूर, दि. 11 :  भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे प्रेरणास्त्रोत म्हणून आपण बोधगया येथे जातो. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांमध्ये  असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. नागपूर येथून या योजनेअंतर्गत यावर्षी सुमारे 800 भाविकांना जाता येत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 नागपूर रेल्वे स्थानक येथून बोधगयेकडे जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, महापौर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय मेश्राम, समीर मेघे, चरणसिंह ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या श्रद्धेच्या तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेण्याची तीव्र इच्छा असते. आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होणे अशक्यप्राय होऊन जाते. अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांना आपल्या तीर्थस्थळाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने शासनाने ही योजना आकारास आणली. आज या योजनेअंतर्गत असंख्य भाविकांना त्याचा लाभ होत आहे. सामाजिक न्याय विभागाने अतिशय उत्तमरित्या ही योजना राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे कौतुक केले.

भाविकांच्या इच्छापूर्तीचा आनंद हा या योजनेची खरी यशस्वीता आहे. या यात्रेत कोणत्याही वृद्ध भाविकांची गैरसोय होऊ नये,या दृष्टीने  सामाजिक न्याय विभागाने काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आपण लवकरच  बोधगया येथे महाराष्ट्रातील भाविकांसाठी व्यापक संकूल निर्माण करीत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते बोधगया येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले

शाश्वत जलव्यवस्थापनावर राज्य शासनाचा भर

 शाश्वत जलव्यवस्थापनावर राज्य शासनाचा भर

-         राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 10 : वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेता जलस्रोतांचे शाश्वत व नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अरुण लखानी यांनी म.वि.प. नियम 97 अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. त्यासंदर्भात त्या बोलत होत्या.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमांतर्गत राज्य जल परिषदेची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता, जलसंपदा, जलसंधारण, कृषी, वन, ग्रामविकास आणि उद्योग या विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापनाचे नियोजन केले जात आहे.

भूजल पातळी वाढविण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत विविध कामे सुरू आहेत. कृषी विभागाच्या शेततळे योजनेसह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलस्रोत बळकटीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वातावरणीय बदल कृती आराखडा तयार केला आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरविकास विभागामार्फतही विविध उपक्रम राबविले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर; तसेच समुद्राच्या पाण्याचे निर्लवणीकरण (डी-सॅलिनेशन) करून दररोज 400 एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन राज्य शासनाने हाती घेतले आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

अमरावती महापालिकेतील कचरा उचल निविदेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

 अमरावती महापालिकेतील कचरा उचल निविदेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

-         मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 10 : अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य धीरज लिंगाडे यांनी म.वि.प. नियम 97 अन्वये या विषयी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी दोन भागांत निविदा काढली होती. त्यामध्ये थेट कचरा उचलणे आणि घराघरातून कचरा संकलन करणे, अशा दोन स्वतंत्र भागांचा समावेश होता. निविदा प्रक्रियेदरम्यान '' पार्टचे तसेच 'बी' पार्टमधील झोन क्रमांक 3 चे 50 टक्के देयक अदा करण्यात आले. या निविदेचा मासिक खर्च 35 कोटी रुपयांवरून अचानक 45 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याबाबतही प्रश्न उपस्थित झाला. तसेच महानगरपालिकेच्या स्थायी समितीनेही या निविदीवर आक्षेप नोंदविला असून, प्रशासकाकडून प्रस्ताव पाठविल्यानंतरही स्थायी समितीने त्यास मंजुरी दिलेली नाही.

संबंधित प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली जाईल. चौकशीत कोणताही गैरप्रकार अथवा अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

0000

Featured post

Lakshvedhi