Tuesday, 27 October 2026

वाढवण बंदराजवळील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारासाठी गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारीचे

 वाढवण बंदराजवळील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारासाठी

गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारीचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन

 

मुंबई, दि. २६ - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजार विकसित करण्याचा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सिंगापूरमधील गुंतवणूकदार, सार्वभौम गुंतवणूक संस्था आणि जागतिक वित्तीय संघटनांशी असलेल्या डीबीएस बँकेच्या नेटवर्कच्या माध्यमातून बँकेने गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारी आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत डीबीएस बँक व आयआयकेअर फाउंडेशनच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी पणन मंत्री रावल बोलत होते.

*जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*

 *जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*


*‘समृद्धीसाठी सचोटी’ या संकल्पनेतून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनजागृती*


ठाणे प्रतिनिधी : 

प्रशासनात पारदर्शकता, सचोटी आणि उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्यासह भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणे आणि नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणे या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आज, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर, २०२६ पासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा सप्ताह दि. १ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सचोटी’ (Probity for Prosperity) अशी आहे.


या सप्ताहांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे, प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि भ्रष्टाचारविरोधी मूल्यांचा प्रसार करणे यावर भर देण्यात येणार आहे.


सप्ताहाच्या अनुषंगाने प्रलंबित तक्रारींचा निपटारा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, क्षमता बांधणी कार्यक्रम, डिजिटल उपक्रम आणि कंत्राट व्यवस्थापन या प्रतिबंधात्मक दक्षता उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, सचोटी व पारदर्शकतेविषयी मार्गदर्शन करणे, भ्रष्टाचारविरोधी विषयांवर निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, चित्रकला, व्यंगचित्र आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करणे, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संदेश पोहोचविणे असे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले की, दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सचोटी, पारदर्शकता व भ्रष्टाचारविरोधी मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांना गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देताना सचोटीची मूल्ये जपावीत आणि दक्षता जनजागृती सप्ताहातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.


जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सर्व संबंधित विभागांनी दक्षता जनजागृती सप्ताह प्रभावीपणे राबवून भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना– मंत्री संजय सावकारे

 संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना– मंत्री संजय सावकारे


वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना सुरू करण्याची सूचना मांडली. या योजनेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच नव्या क्षेत्रांत काम करणाऱ्या युवकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद असावी. संत रविदास महाराजांचे साहित्य महाराष्ट्रात अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे संकलन, प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे. अनुसूचित जातीतील युवकांच्या नवकल्पना आणि उद्योजकीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने स्वतंत्र निधी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करून आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी मांडली.

Monday, 26 October 2026

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणार –

 

 

कुंभमेळ्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीवर भर – मंत्री गिरीश महाजन

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे  होणार आहे. या कुंभमेळ्यात देशभरातून 

 

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  व्यक्तींचा सन्मान करणार – मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्रितपणे पुरस्कार देऊन सन्मानित करावे. नागपूर विभाग, यवतमाळ तसेच राज्यातील अन्य भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विभागनिहाय मर्यादित न ठेवता एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची यामागील संकल्पना आहे. या उपक्रमातून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 


राज्यातील दोन राखीव वनक्षेत्राना अभयारण्याचा दर्जा; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता,महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

 राज्यातील दोन राखीव वनक्षेत्राना अभयारण्याचा दर्जा;

१४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

 

मुंबई, दि. २६ : गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात तसेच तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही यावेळी देण्यात आली.

 

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २६ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. यावेळी वन मंत्री गणेश नाईक दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, मंडळाचे सदस्य तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा.


 मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा.


मतदाराची पात्रता तपासा; दुबार ठराव, सभासदत्वातील विसंगती आणि पूर्वीच्या सहकार विभागाच्या आदेशांशी संबंधित नोंदींची चौकशी करा

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २०२६

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीची सर्वंकष, तांत्रिक आणि कायदेशीर छाननी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, आमची मागणी कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेपुरती मर्यादित नसून सर्व वर्गांतील प्रत्येक मतदाराची पात्रता तपासण्याची आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असताना, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आम्ही दुबार ठराव सादर केल्याच्या मुद्द्यावर आक्षेप नोंदविला होता. संबंधित ठरावांच्या मूळ प्रती, आवक नोंदी, सादरीकरणाची तारीख, संस्थेचे इतिवृत्त आणि अधिकृत प्रतिनिधीच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. ठरावांचे दुबार सादरीकरण झाले आहे का, त्याचा प्रतिनिधित्वाच्या वैधतेवर किंवा मतदार पात्रतेवर काही परिणाम होतो का आणि लागू नियमांनुसार कोणती कार्यवाही आवश्यक आहे, हे स्पष्ट करण्यात यावे. आमच्या आक्षेपावर योग्य चौकशी करून कारणांसह लेखी निर्णय देण्यात यावा.

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाच्या नोंदीची पडताळणी.
एका सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित मतदार नोंदीबाबत आम्ही आक्षेप घेतला आहे. आमच्या आक्षेपानुसार, प्राथमिक मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या संबंधित व्यक्तीचे त्या संस्थेतील सभासदत्व अस्तित्वात असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित संस्थेची मूळ सभासद नोंदवही, सभासदत्व मंजूर करणारा ठराव, प्रवेश अर्ज, सभासद क्रमांक आणि अन्य अधिकृत अभिलेख तपासून संबंधित व्यक्तीचे सभासदत्व व मतदार म्हणून तिची पात्रता निश्चित करण्यात यावी. 

प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेच्या नोंदीबाबत प्रवीण दरेकरांच्या प्रकरणाची चौकशी.
धनंजय शिंदे म्हणाले की, प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या संदर्भात प्रवीण यशवंत दरेकर यांच्या सभासदत्वाच्या पात्रतेबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहकार विभागाने दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार, प्रवीण यशवंत दरेकर यांच्याकडे संबंधित मजूर सहकारी संस्थेचे सभासद म्हणून पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा निर्णय देण्यात आला होता, असे असताना, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सध्याच्या प्राथमिक मतदार यादीमध्ये त्यांचे नाव पुन्हा प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्था मर्यादित यांच्याशी संबंधित सभासद म्हणून कशाच्या आधारे समाविष्ट करण्यात आले आहे, याची सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे. 

मुंबई बँकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर चौकटीत झाली पाहिजे. मतदार यादीतील प्रत्येक नोंद ही संबंधित कायदे, नियम आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वैध ठरली पाहिजे. व्यक्ती कोणतीही असो, संस्था कोणतीही असो किंवा मतदार कोणत्याही वर्गातील असो; सर्वांसाठी समान निकष लागू करा, प्रत्येक नोंदीची पडताळणी करा आणि कायद्यानुसारच अंतिम मतदार यादी निश्चित करा, असेही धनंजय शिंदे म्हणाले.

image.png

सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत ही माहिती

 प्रिय नागरिकांनो,


सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत ही माहिती देण्यात येत आहे.


सोबत दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. यामध्ये सायबर फसवणूक कशी केली जाते आणि त्यापासून सुरक्षित कसे राहावे, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.


सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास, तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी.


अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो करा:


*इन्स्टाग्राम* : https://www.instagram.com/mahacyber


*फेसबुक* : https://www.facebook.com/MahaCyber/


*एक्स (ट्विटर)* : https://x.com/MahaCyber2


*यूट्यूब* : https://youtube.com/@maharashtracyber


*सतर्क राहा, सुरक्षित राहा.*

— महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन

Featured post

Lakshvedhi