Monday, 28 September 2026

चाकणमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येनेवाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बससेवा आणि चौकांचे नियोजन

 वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बससेवा आणि चौकांचे नियोजन


चाकणमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिक येतात. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून वाहतुकीच्या आकडेवारीचा आणि बिग डेटाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून चाकणकडे जाणाऱ्या कामगारांसाठी मार्गनिहाय बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणांहून सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असून बससेवा वाढविल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे.

परिसरातील सहा महत्वाच्या चौकांची सुधारणा करण्याचे नियोजन आहे. चौकांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रचनाकरण, वाहतुकीच्या प्रवाहानुसार वळणांची व्यवस्था आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत दुभाजकांची दुरुस्ती करून नियोजित ठिकाणीच यू-टर्नची सुविधा देण्याचे प्रस्तावित आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी चाकणमधील महत्वाच्या चौकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक सिग्नल यंत्रणा, कॅमेरे, रडार, वाहन क्रमांक ओळख प्रणाली आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र मार्गचाकण औद्योगिक परिसरात कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा

 पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र मार्ग


चाकण औद्योगिक परिसरात कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होते. मात्र, अनेक रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग आणि सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विशेषतः कामगारांची पाळी सुटल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार रस्त्यावरून चालत असल्याने अपघात घडत असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर निवडलेल्या रस्त्यांवर पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणमार्गाच्या कामातही पादचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्

 पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्


· पुणे ग्रोथ हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण


· १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

· मेट्रोचे जाळे २५० किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन


· २०३६ पर्यंत ९० टक्के पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य

मुंबई, दि. २८ : नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही या आराखड्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.


पुणे ग्रोथ हबचे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. आयएसइजीचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष संख्ये आणि मेकेंझीचे रौनक शहा यांनी सादरीकरण केले.

७५ किलोमीटर रस्त्यांचे प्राधान्याने सुधारणा काम

 ७५ किलोमीटर रस्त्यांचे प्राधान्याने सुधारणा काम


चाकण औद्योगिक परिसरातील एकूण ४९८ किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वाहतुकीची घनता, औद्योगिक महत्व, मालवाहतुकीची वर्दळ, रस्त्यांची स्थिती, पाणी साचण्याची समस्या, सुरक्षितता आणि जोडणी या निकषांवर रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे.

या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा आणि रस्त्यांची सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उपलब्ध रस्ते हक्काच्या जागेचा योग्य वापर करून कामे करण्यात येणार असून, या टप्प्यात भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. रस्त्यांमध्ये असलेली अतिक्रमणे हटवून उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करण्याचे नियोजन आहे. याशिवाय रस्त्यांखाली विविध सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र जागेची तरतूद करण्याचाही प्रस्ताव आहे.

चाकणमधील पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रश्न सोडविणार

 चाकणमधील पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रश्न सोडविणार


चाकण औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे. परिसरातील सुमारे ७८ किलोमीटर लांबीच्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळित होणे आणि काही वेळा कंपन्यांचे कामकाज बंद ठेवण्याची वेळ येत आहे.या समस्येवर उपाय म्हणून नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिंचन विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नाल्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची सुमारे ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित अडथळे टप्प्याटप्प्याने दूर करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी संबंधित बांधकामे हटविणे, तर काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांसाठी जागा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. जून २०२७ पर्यंत नैसर्गिक नाले मोकळे करून पाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात

 आली.


1चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी

 1चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी

एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· चाकणमध्ये १,४०० कोटींची तर; हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींची कामे प्रस्तावित

मुंबई, दि. २८ : चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदींच्या सुधारणेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्यास तसेच हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित ४२६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली.


सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले

चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात येणार असल्याचे डुडी यांनी यावेळी सांगितले.

1सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्याकरिता बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करा

 1सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्याकरिता बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करा - डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा (राजेंद्र मोहिते जनसंपर्क अधिकारी,लक्षवेधी, मास मिडिया जय हो 01

पेण सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात मोबाईल आणि इंटरनेटमुळे संस्कृतीचा ऱ्हास होत चालला असून सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्याकरिता बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करा. नमौ बुध्धाय जयभीम चा नारा द्या. बुध्दीजमचा प्रचार अधिक व्हायला पाहिजे. विषमतावादी विचारांवर सकारात्मक विचारांचा प्रभाव करून समतावाद प्रस्तापित करा. बाबासाहेबांनी विज्ञानवादी देश व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. समतासैनीक दलाचे अधिवेशन लवकरच मुंबई मध्ये आयोजित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांनी पेण येथे वंचित बहुजन आघाडी पेण तालुक्यातर्फे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे १४ वे पुष्प निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.


        यावेळी पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की ,जगाला बुद्धिजम देणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. बिहारमधील बौद्धगया येथे देशा विदेशातील पर्यटक लाखोंच्या संख्येने येत असतात त्यामुळे भारताच्या परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. परंतु बौद्ध धर्मीयांच्या आस्तेचा विषय असलेल्या बौद्धगया येथे बहुजन समाजाने अतिक्रमण करून बौद्धगयाचे सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेतले आहेत त्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत लवकरच आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना आनंद सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया धामणकर यांनी ४ मीटर कापडावर रांगोळी द्वारे स्व:हस्ते तयार केलेले वॉलपीस देऊन गौरविण्यात आले.


     याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. भीमरावजी यशवंतराव आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, केंद्रीय सदस्या सुनंदाताई वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सोनावळे, भारतीय बौद्ध महासभा पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष सुनील प्रल्हाद धामणकर, रायगड जिल्हा उत्तर महिला अध्यक्षा उषा कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या धम्मविचारांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना घराघरात पोहोचवा. बुद्धांचा धम्म कोणत्याही व्यक्तीचा द्वेष शिकवत नाही; तो माणसाला माणसाशी जोडतो. बुद्धांनी मन बदलण्याचा मार्ग दाखविला आणि बाबासाहेबांनी समाज बदलण्याचा मार्ग दाखविला, त्या मार्गावर चालून आपल्याला समाजाचा व देशाचा विकास साधायचा आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. आनंद सामाजिक विकास संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या विवाह संस्थेचे काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण होण्याकरीता समाजातील महिलांनी पुढे यावे. महिला बचत गट उभारून व्यवसाय उभा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


   यावेळी पेण तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रायगड समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

Featured post

Lakshvedhi