Monday, 28 September 2026

पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्

 पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्


· पुणे ग्रोथ हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण


· १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

· मेट्रोचे जाळे २५० किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन


· २०३६ पर्यंत ९० टक्के पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य

मुंबई, दि. २८ : नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही या आराखड्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.


पुणे ग्रोथ हबचे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. आयएसइजीचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष संख्ये आणि मेकेंझीचे रौनक शहा यांनी सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi