Thursday, 24 September 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी · शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार · म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

·         शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार

·         म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 

            वाशिम, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

 

            दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

 मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

            राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण गेल्या चार वर्षांत वाढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्रवेशांपैकी ३२.७२ टक्के प्रवेश मुलींचे होते. हे प्रमाण २०२६-२७ मध्ये वाढून ३७.२७ टक्के झाले आहे. ही सकारात्मक बाब असून, मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

            शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबईत रंगणार ‘गायन वादन महोत्सव’ · 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान ‘लतानंद’, ‘सप्तसूर’ आणि ‘भावबंध’ची सुरेल मेजवानी

 मुंबईत रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

·         28 ते 30 सप्टेंबरदरम्यान ‘लतानंद’, ‘सप्तसूर’ आणि ‘भावबंध’ची सुरेल मेजवानी

 

                मुंबई, दि. २३  :रसिकांना विविध संगीत प्रकारांचा सुरेल अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘गायन वादन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

            महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ‘लतानंद’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांमधील वाद्यसुरांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार असून कमलेश भडकमकर आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

            मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी ‘सप्तसूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरांच्या विश्वातील एका अजरामर संध्याकाळचा अनुभव देणारा हा कार्यक्रम केदार देशमुख आणि संच सादर करणार आहेत.

            बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भावबंध’ हा संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. भावगीतांचे रेशीमधागे आणि चित्रपट गीतांची स्पंदने यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार असून प्राची कोकीळ मराठे व सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध संगीत प्रकार आणि कलाविष्कार रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            ‘गायन वादन महोत्सवा’तील सर्व कार्यक्रमांस प्रवेश विनामूल्य असून मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीन दिवसांच्या या सुरेल संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

पिण्याचे पाणी, जलसंधारण, कृषी, आणि वीजपुरवठ्याला प्राधान्य द्या

 पिण्याचे पाणी, जलसंधारण, कृषी, आणि वीजपुरवठ्याला प्राधान्य द्या

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. २३ : राज्यातील  पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलसंधारण, कृषी,  वीजपुरवठ्याशी संबंधित विषयांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

महसूलमंत्री मंत्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार,मंत्री राज्यातील काही भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थितीतील उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करावे,

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका मीनल करणवाल यांनी महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका मीनल करणवाल यांनी महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देण्याचा हा उपक्रम प्रकल्पाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जमीनधारक तसेच भूमिहीन महिला आणि कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आदी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आहे.

 

            प्रमाणपत्रामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील DBT अंतर्गत २२ घटकांसह कृषी अवजारे बँक आणि ॲग्रो प्रोसेसिंग युनिटच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. प्रकल्पांतर्गत ७ हजार २०१ गावांमध्ये पात्र महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सक्रियपणे कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

            या वेबिनारला कृषिताई, कृषीसखी, ‘उमेद’ अभियानातील प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच पात्र महिला शेतकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे विविध कृषी योजना, अनुदाने व शासकीय लाभ मिळवितानाउमेद’ अभियानाशी जोडलेल्या पात्र महिलांनी अर्ज

 उमेद’ अभियानाशी जोड.लेल्या पात्र महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी केले. ग्रामसखी, कृषीसखी, पशुसखी, CRP तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे विविध कृषी योजना, अनुदाने व शासकीय लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि ‘लखपती दीदी’च्या उद्दिष्टपूर्तीस चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत

 ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत आणि ग्रामसभांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. अर्ज ग्रामसेवक किंवा कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सादर करता येणार असून, प्राप्त अर्जांची यादी ग्रामसभेसमोर ठेवून चर्चा व ठरावाद्वारे संबंधित महिलेला शेतकरी म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.

 

            महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी गावातील पात्र महिलांना प्रमाणपत्राचे महत्व व त्याचे लाभ समजावून सांगून अर्ज करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. प्रत्येक पात्र महिला शेतकरी या प्रक्रियेत सहभागी होईल आणि जिल्हा व तालुकास्तरावर १०० टक्के कार्यवाही पूर्ण होईल, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

Featured post

Lakshvedhi