Thursday, 24 September 2026

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका मीनल करणवाल यांनी महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका मीनल करणवाल यांनी महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देण्याचा हा उपक्रम प्रकल्पाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जमीनधारक तसेच भूमिहीन महिला आणि कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आदी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आहे.

 

            प्रमाणपत्रामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील DBT अंतर्गत २२ घटकांसह कृषी अवजारे बँक आणि ॲग्रो प्रोसेसिंग युनिटच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. प्रकल्पांतर्गत ७ हजार २०१ गावांमध्ये पात्र महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सक्रियपणे कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

            या वेबिनारला कृषिताई, कृषीसखी, ‘उमेदअभियानातील प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच पात्र महिला शेतकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi