Wednesday, 23 September 2026

शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पात्र महिला शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये

 कृषिताई, कृषिसखी, उमेद (सीआरपी), ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पात्र महिला शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

वेबिनार  बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४.०० वा होईल, थेट प्रक्षेपण  https://www.youtube.com/@PoCRAMaharashtra/streams या युट्यूब लिंक वर होईल.

 

महिला शेतकरी प्रमाणपत्र ही केवळ नोंदणीची प्रक्रिया नाही; तर महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता देणारे, त्यांच्या हक्कांना बळकटी देणारे आणि शासनाच्या विविध योजनांपर्यंत त्यांची प्रभावी पोहोच सुनिश्चित करणारे हे ऐतिहासिक पाऊल आहे.

0000

महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            नवी दिल्ली, दि. २१ : महाराष्ट्र सदनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेस पण प्रतिसाद मिळाला. ‘नारळ किंवा दूध यापासून गोड पदार्थांची मेजवानी’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली.

 

            सहभागी महिलांनी नारळ किंवा दूध या प्रमुख घटकांचा वापर करून विविध पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण गोड पदार्थ सादर केले. घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ आकर्षक पद्धतीने सजवून सादर करण्यात आल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली.

 

            या स्पर्धेत संयुक्ता देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पौर्णिमा रामटेके यांनी द्वितीय, तर  विमला हब्बू यांनी तृतीय क्रमांक मिळवला. शीतल परब  यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.महाराष्ट्र सदन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मीनाक्षी अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थी, आरोग्य व महिला सक्षमीकरणावर भर

 विद्यार्थी, आरोग्य व महिला सक्षमीकरणावर भर

            सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आस्थापना, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये चित्रकला, भाषण, निबंध, वादविवाद, रांगोळी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून त्यांना शासकीय योजना व उपलब्ध संधींची माहिती देण्यात येत आहे.

            आश्रमशाळा व वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, हिमोग्लोबिन तपासणीवर विशेष भर देण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांची नोंदणी तसेच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबई शहर, उपनगरातील मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

 मुंबई शहर, उपनगरातील मुलांच्या शासकीय वसतिगृह

प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

 

            मुंबई, दि. २२ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

       इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुलांचे शासकीय वसतिगृह, मुंबई शहरसाठी वाशी, नवी मुंबई येथे  तर मुंबई उपनगरसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृह योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत निवासासोबत भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येतो. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (वीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातील १२ वीनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahait.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

       मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर, उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा.

000

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक पुढाकार · महिला शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत ओळख

 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक पुढाकार

 

·         महिला शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी राज्यव्यापी मोहीम

·         २३ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

 

मुंबई, दि. २२  : वर्ष  २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे होत असताना, शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात महिला शेतकऱ्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाला अधिकृत मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, कृषी सेवा, कर्ज, विमा तसेच इतर सुविधांचा सुलभ आणि प्रभावी लाभ मिळावा, या उद्देशाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पात्र महिला शेतकऱ्यांची महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी तसेच प्रमाणपत्र वितरणाचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्र ही केवळ नोंदणीची प्रक्रिया नाही; तर महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता

 कृषिताई, कृषिसखी, उमेद (सीआरपी), ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पात्र महिला शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

वेबिनार  बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४.०० वा होईल, थेट प्रक्षेपण  https://www.youtube.com/@PoCRAMaharashtra/streams या युट्यूब लिंक वर होईल.

 

महिला शेतकरी प्रमाणपत्र ही केवळ नोंदणीची प्रक्रिया नाही; तर महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता देणारे, त्यांच्या हक्कांना बळकटी देणारे आणि शासनाच्या विविध योजनांपर्यंत त्यांची प्रभावी पोहोच सुनिश्चित करणारे हे ऐतिहासिक पाऊल आहे

अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रमाचे आयोजन

 अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रमाचे आयोजन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमाचे आयोजन राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ येथे ३ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, त्यानंतर ४ ऑक्टोंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ५ ऑक्टोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,  ६ ऑक्टोबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ७ ऑक्टोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपतीसंभाजीनगर  ८ ऑक्टोबर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ९ ऑक्टोबर, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर  येथे १० ऑक्टोबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे ११ ऑक्टोबर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे १२ ऑक्टोबर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १३ ऑक्टोबर, संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे १४ ऑक्टोबर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि संबंधित महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi