Wednesday, 23 September 2026

महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            नवी दिल्ली, दि. २१ : महाराष्ट्र सदनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेस पण प्रतिसाद मिळाला. ‘नारळ किंवा दूध यापासून गोड पदार्थांची मेजवानी’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली.

 

            सहभागी महिलांनी नारळ किंवा दूध या प्रमुख घटकांचा वापर करून विविध पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण गोड पदार्थ सादर केले. घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ आकर्षक पद्धतीने सजवून सादर करण्यात आल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली.

 

            या स्पर्धेत संयुक्ता देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पौर्णिमा रामटेके यांनी द्वितीय, तर  विमला हब्बू यांनी तृतीय क्रमांक मिळवला. शीतल परब  यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.महाराष्ट्र सदन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मीनाक्षी अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi