Wednesday, 23 September 2026

इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा,सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीची व्यवहार्यता तपासण्याचे

 इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

·         सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीची व्यवहार्यता तपासण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

            मुंबई, दि. २२ : इगतपुरी परिसरातील उद्योगांमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करावी. संबंधित उद्योगांची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा, सांडपाणी विसर्गाची ठिकाणे तसेच परिसरातील नदी, नाले आणि विहिरींमधील पाण्याचे नमुने तपासून सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

 

            इगतपुरी येथील औद्योगिक प्रदूषणासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

            इगतपुरी परिसरातील काही उद्योगांकडून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने लगतच्या गावांतील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याची बाब आमदार खोसकर यांनी बैठकीत मांडली. या प्रदूषणामुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींकडून प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित उद्योगांची तातडीने तपासणी करावी. उद्योगांमध्ये उपलब्ध सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित आहे का, प्रक्रिया केलेले अथवा न केलेले पाणी बाहेर सोडले जाते का, रात्रीच्या वेळी टँकरद्वारे सांडपाणी सोडले जाते का, याची प्रत्यक्ष पडताळणी करावी. मागील दोन वर्षांत संबंधित उद्योगांवर केलेल्या कारवाईची माहितीही अहवालात समाविष्ट करावी, असेही त्यांनी सांगितले.

 

            परिसरातील उद्योग तीन ते चार किलोमीटरच्या परिघात असल्यास त्यांच्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) उभारता येईल का, याचा अभ्यास करावा. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक, उद्योगांचा सहभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहकार्य याबाबत उपाययोजना सुचवाव्यात. प्रदूषणाची व्याप्ती, पाण्याच्या नमुन्यांचे निष्कर्ष, उद्योगांतील प्रक्रिया व्यवस्था आणि संभाव्य उपाययोजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करावा, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

 मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

            राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण गेल्या चार वर्षांत वाढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्रवेशांपैकी ३२.७२ टक्के प्रवेश मुलींचे होते. हे प्रमाण २०२६-२७ मध्ये वाढून ३७.२७ टक्के झाले आहे. ही सकारात्मक बाब असून, मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

            शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

सीईटी परीक्षा केंद्रांची सुरक्षितता आणि नियंत्रणावर भर

 सीईटी परीक्षा केंद्रांची सुरक्षितता आणि नियंत्रणावर भर

            विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचे स्वागत करून सीईटी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टता मिळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध होण्यासाठी सीईटी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी. मात्र, परीक्षा केंद्रांची संख्या वाढविताना परीक्षेची सुरक्षा आणि पारदर्शकता कायम राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रांवर सीईटी सेलचे अधिक प्रभावी नियंत्रण व देखरेख राहील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

 

            या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची  सद्यस्थितीसंदर्भात सीईटी सेलचे अध्यक्ष दिलीप सरदेसाई यांनी सादरीकरण केले.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्याचा लाभ दिला जातो. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य वितरित केले जाते. तसेच ‘वन नेशन वन रेशन’ सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानातून शिधाजिन्नस घेता येतात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

Tuesday, 22 September 2026

ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

 ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच शिधावाटप विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. शिधापत्रिकाधारकांसाठी उपलब्ध असलेल्या योजना, नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसीचे महत्व तसेच ऑनलाइन सुविधांची माहिती देण्यात आली. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या सदस्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने अधिकृत शिधावाटप दुकानात जाऊन ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

शिधापत्रिकेतील सदस्यांचे मोबाइल सिंडिंग करण्याचे काम सुरू असून, ऑनलाइन रेशन कार्ड सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. शिधावाटपाशी संबंधित तक्रारींसाठी शिधापत्रिकेवर टोल फ्री क्रमांक नमूद करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्याचा लाभ दिला जातो. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य वितरित केले जाते. तसेच ‘वन नेशन वन रेशन’ सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानातून शिधाजिन्नस घेता येतात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

ग्राहकांनी आपल्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक वापरावा१९१५ किंवा १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर pl share

 ग्राहकांनी आपल्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक वापरावा१९१५ किंवा १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर 

दैनंदिन व्यवहारांमध्ये नागरिकांनी ग्राहक म्हणून आपल्या हक्क अधिकारांबाबत दक्ष राहण्याची गरज असून विविध खरेदी व्यवहारांमध्ये नागरिकांनी वस्तूंवरील एक्सपायरी डेट पाहून छापील किंमतीला वस्तू घेण्यासाठी आग्रही असले पाहिजे. पेट्रोल पंपावर मापाप्रमाणे पेट्रोल डिजेल मिळत आहे का याची खातरजमा ग्राहक त्या ठिकाणी असलेल्या अधिकृत मापातून मोजणी द्वारे करु शकता. जर दुकानदार अधिक पैसे लावत असेल तर त्याबाबत वजन मापे कार्यालयात तक्रार नोंदवता येईल तसचे १९१५ किंवा १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकता. तसेच व्हाटसॲप क्रमांक ८८००००१९१५ यावर देखील तक्रार करता येते.यासह वजनमापे कार्यालयामार्फत ग्राहकांची खेरदी व्यवहारात होणारी फसवूणक रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत नायकवाड तसेच गणेश गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहनअंधेरीमध्ये वजन मापे तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ई-केवायसी, आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन

 ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहन

·         गणेशोत्सव मंडळांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारा शासकीय योजनांची नागरिकांना थेट माहिती

·         अंधेरीमध्ये वजन मापे तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ई-केवायसी, आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन

            मुंबई, दि. २२ : शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना शासन योजनांची माहिती थेट  देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवारी अंधेरी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये वजन मापे कार्यालय,आरोग्य विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर, सहाय्यक शिधावाटप अधिकारी विजयकुमार वाघ, आशुतोष राणे, शिधावाटप निरिक्षक श्रीकृष्ण डाहे,नितीन नखाते, सुंदर गजभारे यांच्यासह वजन मापे कार्यालय अंधेरी अधिकारी नायकवाड, सांताक्रुझ वजन मापे कार्यालयाचे अधिकारी गणेश गायकवाड, या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सुरुवातीला माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक मनिषा सावळे यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. यावेळी चकाला परिसरातील आंबेडकर नगरचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय हिंगवाले, गौतमनगर अंधेरी पूर्व भागातील संघर्ष तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल लष्करे ,उपाध्यक्ष तन्मय कांबळे,विजय आव्हाड, जय वाल्मिकी मित्रमंडळ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पिवाल,ओम नवयुग मित्र ममंडळाचे सदा शेट्टी,विशाल चौघुले, आंबडेकर नगर रहिवासी संघ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रेम पुजारी तसेच उपाध्यक्ष महादेव पुजारी,यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi