ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहन
· गणेशोत्सव मंडळांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारा शासकीय योजनांची नागरिकांना थेट माहिती
· अंधेरीमध्ये वजन मापे तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ई-केवायसी, आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन
मुंबई, दि. २२ : शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना शासन योजनांची माहिती थेट देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवारी अंधेरी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये वजन मापे कार्यालय,आरोग्य विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर, सहाय्यक शिधावाटप अधिकारी विजयकुमार वाघ, आशुतोष राणे, शिधावाटप निरिक्षक श्रीकृष्ण डाहे,नितीन नखाते, सुंदर गजभारे यांच्यासह वजन मापे कार्यालय अंधेरी अधिकारी नायकवाड, सांताक्रुझ वजन मापे कार्यालयाचे अधिकारी गणेश गायकवाड, या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सुरुवातीला माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक मनिषा सावळे यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. यावेळी चकाला परिसरातील आंबेडकर नगरचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय हिंगवाले, गौतमनगर अंधेरी पूर्व भागातील संघर्ष तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल लष्करे ,उपाध्यक्ष तन्मय कांबळे,विजय आव्हाड, जय वाल्मिकी मित्रमंडळ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पिवाल,ओम नवयुग मित्र ममंडळाचे सदा शेट्टी,विशाल चौघुले, आंबडेकर नगर रहिवासी संघ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रेम पुजारी तसेच उपाध्यक्ष महादेव पुजारी,यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment