Tuesday, 22 September 2026

स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

 स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्वच्छ शाळा, सुंदर परिसर आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला.

0000

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

 सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

 

मुंबई, दि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत घोघारी मोहल्ला, मस्जिद स्ट्रीट येथील अब्दुल कादिर हाफिजका मनपा उर्दू शाळा तसेच कुंभारवाडा येथील गुलालवाडी मनपा हिंदी शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात आली.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दोन्ही शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्व जाणून घेत विद्यार्थ्यांनीही परिसर स्वच्छ राखण्याचा संदेश आत्मसात केला.

लोकसंवाद २०२६’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क

 विविध विभागांचा समन्वय

‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महसूल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन लोकसंवाद उपक्रमाचे समन्वयन केले.

 

यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये; तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश प्रभाकर अपंडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

 

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला शासकीय योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग लोककल्याणकारी योजनांची माहिती, उपलब्ध सेवा आणि रोजगाराच्या संधी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी होत असून, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.

000

२९ सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ मेळाव्याची माहिती

 २९ सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ मेळाव्याची माहिती

लोकसंवाद उपक्रमादरम्यान २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ मेळावा’चीही माहिती युवक आणि नागरिकांना देण्यात आली. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन आणि उद्योजकतेशी संबंधित उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

 

विशेषतः विद्यार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांपर्यंत रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध संधींची माहिती देत युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

 चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

            जालना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि संभाव्य तूट यांचा समावेश असलेला स्वतंत्र चारा कृती आराखडा तयार करावा. चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता, जिल्ह्याची चारा स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त चारा मिळविण्याचे स्रोत निश्चित करावेत. शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून तेथील चारा उपलब्धतेचा अभ्यास करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

 

पाणी उपलब्ध असलेल्या भागांतील शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. गाळपेरा क्षेत्रांचा चारा उत्पादनासाठी उपयोग करण्याची व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा निर्णय प्रस्ताव तयार करावा. चारा छावण्या अथवा अन्य उपायांसाठी राज्यस्तरीय निर्णय आणि निधीची आवश्यकता असल्यास शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

 

            पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि चारा या विषयांवर केंद्रित स्वतंत्र बैठक २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी जलस्रोतांचे लेखापरीक्षण, चारा नियोजन, संभाव्य पाणीटंचाईची गावे आणि आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती तयार ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.

२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट · मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता

 २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट

·         मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता

 

मुंबई, दि. २१ : मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

२२ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२३ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२४ सप्टेंबर : सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२५ सप्टेंबर : वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

 


अंबरनाथमध्ये महिला व बालविकास विभागाचा ‘लोकसंवाद’ उपक्रम उत्साहात साजरा

 ठाणे जिल्हा राजेंद्र मोहिते पत्रकार,लक्षवेधी मास मिडिया जय हो ०१न्यूज पोर्टल             *शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन,प्रशासन वचनबद्ध


*अंबरनाथमध्ये महिला व बालविकास विभागाचा ‘लोकसंवाद’ उपक्रम उत्साहात साजरा 


ठाणे प्रतिनिधी : शासकीय योजनांची माहिती तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि महिला व बालकांच्या सक्षमीकरणसाठी   ठाणे जिल्हा माहिती कार्यालय यांच्या  आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील ‘दिपक मित्र मंडळ’ येथे ‘लोकसंवाद अभियान’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    

     या कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, त्यांचे स्वरूप आणि प्रत्यक्ष लाभ घेण्याची कार्यपद्धती याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

     ‘लोकसंवाद" अभियान हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवादाचा एक भक्कम दुवा ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, योजनांमधील तांत्रिक बाबी सुलभ करून सांगणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.    

     कार्यक्रमादरम्यान महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता, कौशल्य विकास, पोषण आहार, तसेच बालकांच्या सर्वांगीण संरक्षणाशी संबंधित विविध योजनांची सविस्तर मांडणी करण्यात आली. या योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध शासकीय साहाय्य याबाबत उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली.

     या जनजागृतीपर कार्यक्रमाला परिसरातील महिला तसेच दिपक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी शासकीय योजनांसंबंधी विचारलेल्या विविध शंकांचे अधिकाऱ्यांमार्फत निरसन करण्यात आले, तर कार्यकर्त्यांनी या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

    शासन, प्रशासनाचा व जनतेच्या थेट सु संवाद आणि  सकारात्मक सहभाग यामुळे हा उपक्रम अत्यंत  लोकाभिमुख व सुशासन ठरेल.

00000000

Featured post

Lakshvedhi