ठाणे जिल्हा राजेंद्र मोहिते पत्रकार,लक्षवेधी मास मिडिया जय हो ०१न्यूज पोर्टल *शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन,प्रशासन वचनबद्ध
*अंबरनाथमध्ये महिला व बालविकास विभागाचा ‘लोकसंवाद’ उपक्रम उत्साहात साजरा
ठाणे प्रतिनिधी : शासकीय योजनांची माहिती तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि महिला व बालकांच्या सक्षमीकरणसाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालय यांच्या आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील ‘दिपक मित्र मंडळ’ येथे ‘लोकसंवाद अभियान’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, त्यांचे स्वरूप आणि प्रत्यक्ष लाभ घेण्याची कार्यपद्धती याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
‘लोकसंवाद" अभियान हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवादाचा एक भक्कम दुवा ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, योजनांमधील तांत्रिक बाबी सुलभ करून सांगणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता, कौशल्य विकास, पोषण आहार, तसेच बालकांच्या सर्वांगीण संरक्षणाशी संबंधित विविध योजनांची सविस्तर मांडणी करण्यात आली. या योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध शासकीय साहाय्य याबाबत उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली.
या जनजागृतीपर कार्यक्रमाला परिसरातील महिला तसेच दिपक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी शासकीय योजनांसंबंधी विचारलेल्या विविध शंकांचे अधिकाऱ्यांमार्फत निरसन करण्यात आले, तर कार्यकर्त्यांनी या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शासन, प्रशासनाचा व जनतेच्या थेट सु संवाद आणि सकारात्मक सहभाग यामुळे हा उपक्रम अत्यंत लोकाभिमुख व सुशासन ठरेल.
00000000
No comments:
Post a Comment