एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 800 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यां’ची माहिती लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी गणेशभक्तांना दिली. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या 10 ठिकाणच्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.