गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी अॅड. शेलार यांचे अभिनंदन केले.
bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून गणेशोत्सवातील संस्कृती, परंपरा आणि कला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा, आठवणी आणि कलाविष्कार या व्यासपीठावर नोंदवावेत, असे आवाहन श्रीपाद अष्टेकर यांनी केले. 'फोक लोक’ कार्यक्रमांतील कलाकारांचे अॅड. शेलार यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment