Saturday, 19 September 2026

एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे

 एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 800 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यांची माहिती लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी गणेशभक्तांना दिली. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या 10 ठिकाणच्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.

 

 

 

लोकसंवाद अभियानादरम्यान गणेशभक्तांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन

 नागरिकांच्या शंकांचे निरसन

लोकसंवाद अभियानादरम्यान गणेशभक्तांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, संपर्क साधण्याची ठिकाणे आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शकांनी नागरिकांना माहिती दिली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृतीचे संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना योजनांची माहिती जाणून घेण्याची आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची संधी उपलब्ध झाली

गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा

 गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा

            कोकणातील गुहागर परिसरात महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेती व गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या या शतकानुशतकांच्या प्रथेची निवड करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीलाbappa.org वेब ॲपच्या माध्यमातून

 गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी अॅड. शेलार यांचे अभिनंदन केले.

 

            bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून गणेशोत्सवातील संस्कृती, परंपरा आणि कला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा, आठवणी आणि कलाविष्कार या व्यासपीठावर नोंदवावेत, असे आवाहन श्रीपाद अष्टेकर यांनी केले. 'फोक लोककार्यक्रमांतील कलाकारांचे अॅड. शेलार यांनी अभिनंदन केले.

आरोग्यसेवा क्षेत्रात येणार पारदर्शकता आणि सक्षमता

 आरोग्यसेवा क्षेत्रात येणार पारदर्शकता आणि सक्षमता

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून या परिषदेचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. या ऐतिहासिक कार्यवाहीमुळे राज्याच्या सहयोगी व आरोग्यसेवा क्षेत्रात दर्जेदार व्यावसायिक मानके, उत्तम आचारसंहिता, योग्य मूल्यांकन आणि एक अत्यंत सक्षम व उत्तरदायी व्यवस्था निर्माण होण्यास मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी आणि रुग्णांच्या सेवेसाठी हा निर्णय एक मोठा मैलाचा दगड ठरणार आहे!

आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी या परिषदेअंतर्गत चार महत्त्वपूर्ण स्वायत्तमंडळांची स्थापना

 दर्जा उंचावण्यासाठी चार स्वायत्त मंडळांची स्थापना

            आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी या परिषदेअंतर्गत चार महत्त्वपूर्ण स्वायत्त मंडळांची स्थापना केली जाणार आहे. पदवीपूर्व सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, पदव्युत्तर सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय मूल्यांकन व मानांकन मंडळ आणि सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय आचारसंहिता व नोंदणी मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे.

            सध्या या व्यावसायिकांच्या नोंदणी प्रक्रियेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. यामुळे पुढील कार्यवाही सुरू करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात फिजिओथेरपिस्ट, रेडियोग्राफर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि इतर ५० हून अधिक विषयांचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेता येणार आहे. याचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

 

लोकसंवाद अभियानादरम्यान गणेशभक्तांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन

 नागरिकांच्या शंकांचे निरसन

लोकसंवाद अभियानादरम्यान गणेशभक्तांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, संपर्क साधण्याची ठिकाणे आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शकांनी नागरिकांना माहिती दिली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृतीचे संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना योजनांची माहिती जाणून घेण्याची आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.

0 0 0

 

Featured post

Lakshvedhi