शेती व सिंचन: अल-निनोमुळे पावसाची स्थिती समाधानकारक नसली तरी प्रशासनाला आवश्यक पाहणीच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४९१ कोटी रुपये जमा करून सातबारा कोरा करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ४०० गावांची निवड झाली आहे. तर आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध होऊन २६ गावांतील ८,१४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 17 September 2026
रेल्वेच्या शुभारंभासोबतच बीड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ
रेल्वेच्या शुभारंभासोबतच बीड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ आज रोवली गेली. बीडच्या स्थानिक कलाकारांसाठी अनेक दशकांपासून हक्काचे व्यासपीठ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आला असून, जुन्या भिंती कायम ठेवत येथे अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत. यासोबतच, धानोरा रस्त्यावरील "पंढरी" येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचे भव्य तारांगण व विज्ञान उद्यान उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.
बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला
बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला
बीड, दि १७ (जिमाका):- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही मोठ्या उत्साहात पार पडले.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित या लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे प्रामुख्याने उपस्थित होते. बीड जिल्हा अनेक दशके रेल्वे नकाशापासून दूर असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून आज सुरू झालेल्या या थेट रेल्वेसेवेमुळे बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.
बीडचा सर्वांगीण विकास साधणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; विविध विकासकामांची घोषणा
बीडचा सर्वांगीण विकास साधणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; विविध विकासकामांची घोषणा
बीड, दि.१७ (जिमाका):- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज बीड येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंड येथे शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले. मराठवाड्याच्या लढ्यात बीड आणि अंबेजोगाईचा मोठा वाटा राहिला असून, या ऐतिहासिक भूमीचा चेहरामोहरा बदलून 'सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड' घडवण्याचा संकल्प पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला
आरोग्य सुविधांचा विकास
आरोग्य सुविधांचा विकास
आरोग्य सुविधांच्या विकासाबाबत श्री. फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७१० कोटी रुपयांच्या नवीन इमारतीची उभारणी, धाराशिवमध्ये राज्यातल्या एक ५०० खाटांचे अद्यावत रुग्णालय, मेडिकल कॉलेज असेल, किंवा परळीमध्ये ५६५ कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधांच्या विकासाचे काम आपण सुरु केले आहे,असे ते म्हणाले.
सक्षम आणि जलद दळणवळण
सक्षम आणि जलद दळणवळण
उद्योगाच्या परिसंस्था विकासासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत ते म्हणाले की, जालना ड्रायपोर्टचं काम आता सुरू झालंय. आपल्याकडे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या आवश्यक आयात निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टवरुन करण्यात आली आहे. तसेच संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही आपल्याला चांगला वाव आहे. त्यासाठी आपण शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करतोय. त्याकरता साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातला सगळ्यात लांब उन्नत रस्ता आपण तयार करतो त्यामुळे कुठलाही ट्रॅफिक जॅम पुढच्या काळामध्ये होणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
उद्योग क्षेत्राचा विस्तार
उद्योग क्षेत्राचा विस्तार
उद्योग विस्ताराबाबत श्री. फडणवीस म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येतेय आणि या गुंतवणुकीला अनुरूप आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरदेखील तयार करतो आहोत. अजून ८,००० एकर जागा त्या ठिकाणी अधिग्रहित करून आपली औद्योगिक वसाहत आपण मोठी करत आहोत. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे आपल्याकडे रोजगाराची निर्मिती होतेय आणि या रोजगारातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न मराठवाड्यात होत आहे,असे त्यांनी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...