Thursday, 17 September 2026

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला

 बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

 

रेल संख्या झिरो वन फोर झिरो वन प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला

 

          बीड, दि १७ (जिमाका):- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही मोठ्या उत्साहात पार पडले.

            या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके,  आमदार विजयसिंह पंडित या लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे प्रामुख्याने उपस्थित होते. बीड जिल्हा अनेक दशके रेल्वे नकाशापासून दूर असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून आज सुरू झालेल्या या थेट रेल्वेसेवेमुळे बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi