मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ‘इनोव्हेशन लेड इकॉनॉमी’ म्हणून विकसित करण्यावर भर देत नवोन्मेषाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी अधोरेखित केले.स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि युवा नवोन्मेषक यांना सक्षम व सर्वसमावेशक परिसंस्थेत जोडून प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 17 September 2026
नवोन्मेषाच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६
नवोन्मेषाच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६ सिंगापूरमध्ये जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्टार्टअप व इनोव्हेशन व्हिजनचे सादरीकरण
मुंबई, दि. १६ : नवोन्मेष करूया, इनक्युबेशनला चालना देऊया आणि एकत्रितपणे व्यापक परिणाम साधूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशातून महाराष्ट्राच्या नवोन्मेषाधारित विकासाचा संकल्प सिंगापूर येथे आयोजित ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये जागतिक समुदायासमोर मांडण्यात आला. एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या महाराष्ट्राच्या संकल्पाचा निर्धार त्यांनी या परिषदेद्वारे जागतिक व्यासपीठावर मांडला.
आशियातील दोन हजारांहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक नेते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.
Wednesday, 16 September 2026
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा. त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. चुकीच्या बाबी, अफवांचे तातडीने खंडन करावे, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली.
बैठकीनंतर महासंचालक श्री. सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी
कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी
शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
ज्या गणेश मंडळांना या कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मुंबई शहर व उपनगर गणेश मंडळानी माहिती व जनसंपर्क विभाग,मंत्रालय मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
विविध विभागांच्या योजनांची माहिती
विविध विभागांच्या योजनांची माहिती
प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे.
शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
