Tuesday, 15 September 2026

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’मध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मुलाखत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी

 जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलासमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मुलाखत

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्रच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी

 

            मुंबई, दि. ११ : राज्यातील युवक आणि युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्रया महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे  राज्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या शासनाच्या प्रयत्नांबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जय महाराष्ट्रआणि दिलखुलासया कार्यक्रमांतून विशेष संवाद साधला आहे.

 

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. तसेच दिलखुलासकार्यक्रमातून दि. १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर या मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

 

अधिकृत समाजमाध्यमे :

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

राज्यातील युवांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे तसेच युवकांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. येत्या  दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून युवकांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ आणि कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या शक्यता उपलब्ध होणार आहेत.

 

या विशेष मुलाखतीत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र"ची  संकल्पना, त्याचे नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्यविकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि राज्यातील भविष्यातील रोजगारनिर्मितीची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. युवक व युवतींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे

राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         राज्यपालांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२७ वा दीक्षान्त समारंभ

 

            पुणे, दि. १०  : कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.  यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पराग काळकर , कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

            राज्यपाल म्हणालेदीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष क्षण असून या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. बदलत्या परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी आजीवन ज्ञानार्जन करत नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा, असे आवाहनी त्यांनी केले.

भरती परीक्षा सुधारणा; उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नागपूर येथे १६ सप्टेंबरला विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद

 भरती परीक्षा सुधारणा; उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नागपूर येथे १६ सप्टेंबरला

विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी  थेट संवाद

मुंबई, दि. १५ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्या, बुधवार १६  सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर येथे संवाद साधणार आहे. हा संवाद कार्यक्रम डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे होणार आहे. या संवाद भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.


          राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष ‍थेट संवाद साधत आहे. दिनांक १२ सप्टेंबर रोजी पुणे विभागात टास्क फोर्सने संवाद साधला.

टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक

नागपूर विभाग १६ सप्टेंबर २०२६

स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल-
nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

अमरावती विभाग १७ सप्टेंबर २०२६

स्थळ-अमरावती
ई-मेल-
amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

छत्रपती संभाजीनगर विभाग २१ सप्टेंबर २०२६

स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर

ई-मेल-csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

कोकण विभाग २९ सप्टेंबर २०२६

स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

ई-मेल-konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नाशिक विभाग ३० सप्टेंबर २०२६

स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

ई-मेल-nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

             नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

शासनाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना बाजारपेठेची मागणी आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांची जोड

 शासनाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना बाजारपेठेची मागणी आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांची जोड देण्यासाठी या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कृषी-व्यवसाय, अन्नप्रक्रिया, बँकिंग, वित्त, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा विकास आणि स्टार्टअप क्षेत्रातील सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या चर्चांमधून राज्यातील संभाव्य कृषी क्लस्टर्स, गुंतवणुकीच्या संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व अभिप्राय प्राप्त होणार असल्याचे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. या मेळाव्यातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांच्या आधारे प्राधान्य कृषी क्लस्टर्स, मूल्यसाखळ्या, पायाभूत सुविधा आणि अपेक्षित गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर खासगी क्षेत्राचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टप्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

 

मॅग्नेट २.० च्या माध्यमातून महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता प्रक्रिया, मूल्यवर्धन, आधुनिक साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि निर्यातक्षम कृषी-व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील आहे. या गुंतवणूकदार मेळाव्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी आणि शेतमालाला अधिक मूल्य मिळण्याच्या प्रक्रियेला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे. 

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत

 आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख फळपिके तसेच विविध कृषी उत्पादनांसाठी उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि विपणन यांचा समावेश असलेली एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहे. विस्तारित टप्प्यात द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले आणि फणस या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. 

 

मॅग्नेट २.० अंतर्गत हब-अँड-स्पोकमॉडेलवर आधारित मोठ्या प्रमाणावर कृषी-व्यवसाय पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधांमुळे शेतमालाची नासाडी कमी होण्यासह अधिक चांगल्या बाजारपेठा, मूल्यवर्धनाच्या संधी आणि निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि रिटेल क्षेत्र यांना एका मूल्यसाखळीत जोडण्याचे कामही या माध्यमातून होणार आहे. 

मॅग्नेट २.० मुळे कृषी-व्यवसाय क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल

 मॅग्नेट २.० मुळे कृषी-व्यवसाय क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल

                                                -पणन मंत्री जयकुमार रावल

'मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट'

गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन १६ सप्टेंबर रोजी

 

मुंबई, दि. १५ : राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यास आणि मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यास चालना देणाऱ्या 'मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट' या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे करण्यात आले असून, या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. 

 

पणन मंत्री रावल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक व्यापक बाजारपेठ, दर्जेदार प्रक्रिया सुविधा आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा मॅग्नेट २.० प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी भक्कम मूल्यसाखळी उभारण्याचे काम या प्रकल्पातून केले जात आहे. 

 

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख फळपिके तसेच विविध कृषी उत्पादनांसाठी उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि विपणन यांचा समावेश असलेली एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहे. विस्तारित टप्प्यात द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले आणि फणस या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. 

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

 दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

 

मुंबई, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात ९० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

 

याप्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड  (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.

 

या सामंजस्य करारानुसार एमडीएलने दिघी येथे प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे.

 

दिघी येथील या प्रकल्पामुळे आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा तसेच त्यास पूरक औद्योगिक व पुरवठा साखळी परिसंस्था विकसित होणार आहे. देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढ, तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती आणि जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यास या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

 

एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि सक्षम देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था विकसित करण्याचा अनुभव एमडीएलकडे आहे. सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने दिघी येथे आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी  प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.

00000

Featured post

Lakshvedhi