Sunday, 13 September 2026

नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित

 नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक,

 ५० हजार रोजगार अपेक्षित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या निर्यातीत तसेच आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या उद्योगाला पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळणाची जोड देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. भारत डायमंड बोर्सने निर्माण केलेल्या सक्षम परिसंस्थेमुळे या उद्योगाच्या वाढीला मोठी चालना मिळाली आहे. या ठिकाणी दररोज सुमारे ३० ते ३५ हजार व्यापारी, कारागीर आणि कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत असतात. त्यांच्या परिश्रमामुळे या क्षेत्राचा व्यापार २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

भारताला रत्न व आभूषण व्यापाराची प्राचीन परंपरा

 भारताला रत्न व आभूषण व्यापाराची प्राचीन परंपरा

भारताची रत्ने आणि आभूषणे ही हजारो वर्षांपासून जगभरातील ओळख आहे. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीपासून भारतातून रत्ने व आभूषणांचा व्यापार होत असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, मध्ययुगीन काळात राजाश्रयामुळे जडजवाहीर आणि आभूषण कलेला नवी उंची मिळाली. कुंदन, मीनाकारी यांसारख्या कलांचा विकास झाला. जयपूरची ओळख आजही रंगीत रत्नांची जागतिक राजधानी म्हणून आहे.

जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा हिऱ्यांपैकी नऊ हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया होते. सुरतच्या हिरे उद्योगाने लाखो नागरिकांना रोजगार आणि आत्मनिर्भरता दिली असून देशाच्या अर्थव्यवस्थेत व निर्यातीत मोठे योगदान दिले आहे. मुंबईनेही रत्न व आभूषण व्यापाराला निर्यातीची महत्त्वाची धुरा बनविले आहे. भारत डायमंड बोर्स हा भारतीय रत्न व आभूषण उद्योगाच्या जागतिक सामर्थ्याचे प्रतीक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे

 लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे

-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक,

५० हजार रोजगार अपेक्षित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्समध्ये उद्योगातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव

 

मुंबई, दि. १३ :- प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा ५२ वा इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि कौन्सिल' चे अध्यक्ष किरीट भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँकर्स, महिला उद्योजक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे सामर्थ्य आहे. लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळखून भारतीय उद्योगाने केवळ कामाची गतीच नव्हे, तर व्यवसायाची व्याप्तीही वाढवावी. भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये स्वतःची विक्री केंद्रे उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली आहे. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचेही केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.

कोकण , नागपूर विभाग परिक्षेत्र साठी ‘लक्षवेधी मास मीडिया’चे मार्गदर्शन केंद्र कार्यान्वितमनिष चवरे यांची जनसंपर्क अधिकारी नियुक्ती

 📰 लक्षवेधी – विशेष वृत्तांत

कोकण , नागपूर विभाग परिक्षेत्र साठी ‘लक्षवेधी मास मीडिया’चे मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित

रायगड : लक्षवेधी मास मीडिया तर्फे  कोकण , नागपूर विभाग परिक्षेत्र साठी मनिष चवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न तसेच सामाजिक आणि विकासात्मक  धोरण  लक्षवेधी माध्यमातून  समस्याचे निरसन,उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सण-महोत्सव, महिला व युवा प्रश्न, बचत गट, सहकारी संस्था, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार संघटना यांच्याशी संबंधित विषयांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांसाठी कायदे, न्याय,शासकीय अनुदाने आणि आरोग्यविषयक सुविधांबाबत मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शासकीय योजना व उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील विषय लक्षवेधी मास मीडियाच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क मनीष चवरे, जन्स्मपर्क अधिकारी


लक्षवेधी मास मिडिया,कोकण ,नागपूर विभाग– संपर्क 7400480021

🌐 संकेतस्थळ : lakshvedhimm.blogspot.com

“साथ हमारा, विकास तुम्हारा!”

पनवेल ,उरण,पेण (रायगड) सानिका डबीर,जनसंपर्क अधिकारी,. मास मीडिया’चे मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित,

 + लक्षवेधी – विशेष वृत्तांत

पनवेल ,उरण,पेण (रायगड) . मास मीडिया’चे मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित, : लक्षवेधी मास मीडिया तर्फे रायगड .जिल्ह्यातील  पनवेल,पेण उरण ,   तालुका जनसंपर्क अधिकारी म्हणून सानिका डबीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न तसेच सामाजिक आणि विकासात्मक विषयांना माध्यमातून वाचा फोडण्याचा उपक्रम l सुरू करण्यात आला आहे.

 औद्योगिक,पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सण-महोत्सव, महिला व युवा प्रश्न, बचत गट, सहकारी संस्था, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार संघटना यांच्याशी संबंधित विषयांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांसाठी कायदे, शासकीय अनुदाने आणि आरोग्यविषयक सुविधांबाबत मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शासकीय योजना व उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या लक्षवेधी मास मीडियाच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क : सानिका डबीर,जनसंपर्क अधिकारी,


पनवेल,पेण,उरण संपर्क +91 96042 20784

🌐 संकेतस्थळ : lakshvedhimm.blogspot.com

“साथ हमारा, विकास तुम्हारा!”

लक्षवेधी मास मीडिया तर्फे मुंबई शहर उपनगर, मीरा भाईंदर वसई विरार,पालघर,रत्नागिरी जिल्हा मधील रिपोर्टर

 .: लक्षवेधी मास मीडिया तर्फे   मुंबई शहर उपनगर, मीरा भाईंदर वसई विरार,पालघर,रत्नागिरी जिल्हा   मधील रिपोर्टर 


म्हणून  श्री  चंदन मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न तसेच सामाजिक आणि विकासात्मक विषयांना माध्यमातून वाचा फोडण्याचा उपक्रम यानिमित्ताने सुरू करण्यात आला आहे.

या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सण-महोत्सव, महिला व युवा प्रश्न, बचत गट, सहकारी संस्था, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक. आणि कामगार संघटना यांच्याशी संबंधित विषयांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांसाठी कायदे, शासकीय अनुदाने आणि आरोग्यविषयक, प्रदूषण अन्य समस्या, बाबत  मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शासकीय योजना व उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या लक्षवेधी मास मीडियाच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क : चंदन  मयेकर, रिपोर्टर , +91 

99208 09457

🌐 संकेतस्थळ : lakshvedhimm.blogspot.com

“साथ हमारा, विकास तुम्हारा!”

 |

लक्षवेधी मास मीडिया तर्फे ठाणे जिल्हा मधील जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री सिद्धेश साळवी यांची नियुक्ती


 : लक्षवेधी मास मीडिया तर्फे   ठाणे जिल्हा   मधील    जनसंपर्क अधिकारी म्हणून  श्री सिद्धेश साळवी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न तसेच सामाजिक आणि विकासात्मक विषयांना माध्यमातून वाचा फोडण्याचा उपक्रम यानिमित्ताने सुरू करण्यात आला आहे.

या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सण-महोत्सव, महिला व युवा प्रश्न, बचत गट, सहकारी संस्था, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक. आणि कामगार संघटना यांच्याशी संबंधित विषयांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांसाठी कायदे, शासकीय अनुदाने आणि आरोग्यविषयक, प्रदूषण अन्य समस्या, बाबत  मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शासकीय योजना व उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या लक्षवेधी मास मीडियाच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क : सिद्धेश साळवी,जनसंपर्क अधिकारी, +91 9930817333


🌐 संकेतस्थळ : lakshvedhimm.blogspot.com

“साथ हमारा, विकास तुम्हारा!”

 |

Featured post

Lakshvedhi