Friday, 11 September 2026

धारावी, ठाणे पुनर्विकास,विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण

 धारावी, ठाणे पुनर्विकास

            शहरी विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती उभारणे नव्हे, तर लोकांचे जीवनमान सुधारणे होय, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प, ठाणे क्लस्टर पुनर्विकास, मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास ही उदाहरणे सांगितली. 

विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण

            मुंबईने दक्षिण आशियातील पहिले स्वतंत्र नेट-झिरो क्लायमेट अॅक्शन प्लॅन सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले. २०३० पर्यंत राज्याच्या वीज गरजेपैकी ५० टक्के गरज स्वच्छ ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा औद्योगिक वापर केला जात आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित न्यू महाबळेश्वर प्रकल्पात मोठा भाग संरक्षित हिरव्या क्षेत्रासाठी ठेवण्यात येणार असून पर्यावरणपूरक पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


मोठ्या पायाभूत सुविधा

  मोठ्या पायाभूत सुविधा

            हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळते आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मुंबईसह राज्यातील विविध भागांना देश-विदेशातील बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, कोकण एक्स्प्रेस वे आणि कोकण किनारी मार्गासारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील विविध विकास केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. यामुळे पर्यटन, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधा

 महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधा

            हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळते आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मुंबईसह राज्यातील विविध भागांना देश-विदेशातील बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, कोकण एक्स्प्रेस वे आणि कोकण किनारी मार्गासारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील विविध विकास केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. यामुळे पर्यटन, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रिटन-महाराष्ट्र व्यापाराला नवी दिशा

 ब्रिटन-महाराष्ट्र व्यापाराला नवी दिशा

            भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी संधी निर्माण झाली असून लंडनमध्ये डिझाइन करा आणि महाराष्ट्रात उत्पादन करा, अशी नवी भागीदारी उभी करण्याचे आवाहन त्यांनी ब्रिटिश उद्योगविश्वाला केले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने

 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने

            महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा प्रमुख इंजिन असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी मांडली. देशाच्या जीडीपी आणि निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा असून महाराष्ट्राला दक्षिण आशियाची तंत्रज्ञानाची राजधानी बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदींमुळे भारताची आर्थिक ताकद वाढली

 प्रधानमंत्री मोदींमुळे भारताची आर्थिक ताकद वाढली

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मोदी यांनी देशासमोरील मोठ्या आर्थिक आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर केले. त्यांच्या दूरदृष्टीच्या आणि गतिमान नेतृत्वामुळे भारत आज जागतिक स्तरावर एक महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे येत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुमारे दशकापूर्वी भारताचा समावेश जगातील फ्रॅजाइल फाइव्हम्हणजेच कमकुवत अर्थव्यवस्थांच्या गटात केला जात होता. आज भारत जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे. पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल सार्वजनिक सेवा, कर सुधारणा आणि गरजू नागरिकांना थेट मदत यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

            ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडियाआणि डिजिटल इंडियाया उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या विकासाला स्पष्ट दिशा देण्यात आली आहे.

            ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर मध्यपूर्वेतील देशांच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. सध्या ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ग्लोबल एमबीएचे शिक्षण घेत आहेत अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात, या शिखर परिषदेच्या माध्यमातून

    स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात, या शिखर परिषदेच्या माध्यमातून कृषी सौर ऊर्जा आणि वितरित सौर प्रकल्पांमध्ये सुमारे 50 दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंतच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य निर्माण झाले आहे. महावितरणच्या फीडर सोलरायझेशन कार्यक्रमांतर्गत तसेच इतर तत्सम प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील विकासकांसोबत पुढील कार्यवाही आधीच सुरू करण्यात आली आहे.

 

Featured post

Lakshvedhi