Friday, 11 September 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली

महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

 

            मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम 2026 मध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन रिमूव्हल, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यातील हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

 

            महाप्रीत आणि सुगम-सीएसएस यांच्या भागीदारीतून, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाल्याच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये (क्लस्टर्समध्ये) 100 सौरऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृहे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, 'आयकार्ट' आणि 'आयकार्ट राईज फाउंडेशन' यांच्या माध्यमातून, राज्यातील 10 हून अधिक क्षेत्रांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी गटांसाठी आधीच उभारण्यात आलेल्या 50 सूक्ष्म शीतगृहांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सहाय्य दिले जात आहे. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Thursday, 10 September 2026

यंदाचा पोषण माह हा पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध अन्नगटांचा समावेश

 यंदाचा पोषण माह हा पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध अन्नगटांचा समावेश आणि स्थानिक अन्नपदार्थांवर भर देऊन आहारातील विविधतेस प्रोत्साहन देणे. नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि एसएनपी मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणासाठी समुदायाची मालकी व उत्तरदायित्व बळकट करणे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षणामध्ये ईसीसीई संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे मूलभूत घटक म्हणून प्रोत्साहित करणे तसेच बालक काय खाते आणि कसे शिकते यामधील अविभाज्य संबंध अधोरेखित करणे. याचबरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या भारतातील प्रमुख मातृत्व लाभ योजनेची १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मातृ पोषण, आरोग्यविषयक सकारात्मक सवयी, गर्भावस्थेदरम्यान आर्थिक सहाय्य आणि जीवनातील पहिल्या १००० दिवसांतील मातृ पोषण व संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करण्यावर या पोषण माहमध्ये भर देण्यात येणार आहे.


राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

 राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

मुंबई, दि. १० : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त वर्षा लड्डा, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त माधवी सरदेशमुख उपस्थित राहणार आहेत.

वा राष्ट्रीय पोषण माह २०२६, माझी अंगणवाडी माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. पोषण अभियानांतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येतो. गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुले-मुली आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये पोषण, आरोग्य व संगोपनासंदर्भात व्यापक सहभागातून सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा पोषण माह साजरा केला जातो.

कुटुंबीयांशी थेट समन्वय

 कुटुंबीयांशी थेट समन्वय

            बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसोबत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या माहिती व तक्रारींचे राज्य तसेच केंद्र शासनाच्या स्तरावर तातडीने निराकरण करण्यासाठी समन्वय साधला जात आहे. नागरिकांकडून प्राप्त सर्व अनुषंगिक माहिती संबंधित यंत्रणांना तत्काळ कळविण्यात येत आहे.नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून आवश्यक प्रेस नोटही प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून नेपाळ सरकारकडेही  विनंती करण्यात आली असून कार्यवाही केली जात आहे.

0000

मोबाईलचे ‘लास्ट नोन लोकेशन’ मिळविण्यासाठी दूरसंचार विभागाशी संपर्क

 मोबाईलचे लास्ट नोन लोकेशनमिळविण्यासाठी दूरसंचार विभागाशी संपर्क

बेपत्ता नागरिकांच्या शोधकार्यात मदत व्हावी यासाठी नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचे शेवटचे ज्ञात ठिकाण उपलब्ध करून देण्याची विनंती दूरसंचार विभागाला करण्यात आली आहे. यासंदर्भात ४ सप्टेंबर २०२६ रोजी दूरसंचार विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे.

बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी डीएनए नमुने संकलित

 बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी डीएनए नमुने संकलित

            नेपाळ पूर दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची ओळख पटविण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या समन्वयाने DFSL, कालिना तसेच संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून कुटुंबीयांचे DNA नमुने संकलित करण्यात आले आहेत. निर्धारित स्वरूपात DNA प्रोफाइल तयार करून हे नमुने Central Forensic Laboratory, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत.

नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय

 नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या

सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय

  • बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय

 

मुंबई, दि. १० : नेपाळतिबेट प्रदेशातील पूर आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले असल्याचे वृत्त प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्र तातडीने २४x७ कार्यान्वित करण्यात आले. अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे, तिची पडताळणी करणे तसेच बचाव व मदतकार्याचा समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत विविध स्तरांवर कार्यवाही करण्यात आली आहे असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून तिची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राप्त अद्ययावत माहितीची यादी तात्काळ भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासह संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आली.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे नोंद असलेल्या ४०६ पर्यटकांपैकी ६७ नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नसून, उर्वरित नागरिक महाराष्ट्रात सुखरूप परतले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध, ओळख आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय, नेपाळ व चीनमधील भारतीय दूतावास, केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, नवी दिल्ली, दूरसंचार विभाग तसेच बेपत्ता नागरिकांचे कुटुंबीय यांच्याशी सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi