Wednesday, 9 September 2026

बॉम्बे हॉस्पिटलमधील कंत्राटी महिला कर्मचारी व परिचारिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात

 बॉम्बे हॉस्पिटलमधील कंत्राटी महिला कर्मचारी व

परिचारिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात

-कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

            मुंबई, दि. ८ : मे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला कर्मचारी व परिचारिका यांच्या विविध समस्या तसेच प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर रुग्णालय प्रशासन व कामगार संघटनांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे निर्देश कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

            कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मे. बॉम्बे हॉस्पिटल संबंधित कर्मचारी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच रुग्णालय व्यवस्थापन प्रतिनिधींशी विविध विषयांसंदर्भात बैठक झाली. यावेळी रुग्णालय व्यवस्थापन, विश्वस्त, कामगार संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

 

            एमओटी विभागामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कालावधीचा विचार करून त्यांच्याबाबत कामगार कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी नियमानुसार त्यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्याबाबत कामगार संघटना आणि रुग्णालय प्रशासनाने परस्पर समन्वयातून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

            रुग्णालय प्रशासन आणि व्यवस्थापकाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून सामंजस्याने सर्व समस्यांचे निराकरण करावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा. प्रशासन आणि कामगारांनी सुवर्णमध्य साधून आरोग्यसेवेसाठी उत्तम कार्य व पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. रुग्णालयातील आरोग्यसेवा सुरळीत राहण्यासाठी कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक संवाद, समन्वय व परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आरक्षणात या खेळांचा समावेश - धनुर्विद्या, ॲथलेटिक्स / मैदानी व धावण्याचे खेळ, बॅडमिंटन, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, कॅनोइंग व कयाकिंग, क्रिकेट, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स / कसरतपटूंचे खेळ, हँडबॉल, हॉकी, ज्यूडो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, नौकानयन, रग्बी, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, आधुनिक पंचक्रीडा, वेटलिफ्टिंग / भारोत्तोलन, कुस्ती, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, क्रीडा गिर्यारोहण, गोल्फ, बुद्धिबळ, अश्वारोहण, नौकानयन / सेलिंग, टेनिस.

 आरक्षणात या खेळांचा समावेश -

            धनुर्विद्या, ॲथलेटिक्स / मैदानी व धावण्याचे खेळ, बॅडमिंटन, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, कॅनोइंग व कयाकिंग, क्रिकेट, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स / कसरतपटूंचे खेळ, हँडबॉल, हॉकी, ज्यूडो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, नौकानयन, रग्बी, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, आधुनिक पंचक्रीडा, वेटलिफ्टिंग / भारोत्तोलन, कुस्ती, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, क्रीडा गिर्यारोहण, गोल्फ, बुद्धिबळ, अश्वारोहण, नौकानयन / सेलिंग, टेनिस.

गट-क पदासाठी खेलो इंडिया स्पर्धा (साईद्वारे आयोजित), अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राज्य स्तर वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित), राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा

             गट-क पदासाठी खेलो इंडिया स्पर्धा (साईद्वारे आयोजित), अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राज्य स्तर वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित), राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त 19 वर्षाखालील गट मुले/मुली), राज्यस्तर आंतर विद्यापीठ स्पर्धा (अश्वमेध)/(क्रीडा महोत्सव) / पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा आणि राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक व मान्यता प्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तर पॅरा क्रीडा स्पर्धांतील पदकप्राप्त खेळाडू पात्र असतील.

गट-ड पदासाठी खेळ विषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा/वरिष्ठ गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ गटातील पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू पात्र असेल.

गट अ पदासाठी अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक गेम्स, एशियन्स गेम्स, वरिष्ठ गटाच्या जागतिक चॅम्पियनशीप/कप, वरिष्ठ गटाच्या एशियन चॅम्पियनशीप

   गट अ पदासाठी अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक गेम्स, एशियन्स गेम्स, वरिष्ठ गटाच्या जागतिक चॅम्पियनशीप/कप, वरिष्ठ गटाच्या एशियन चॅम्पियनशीप/कप, कॉमनवेल्थ गेम्स, वरिष्ठ गटाच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप/कप, ग्रँडमास्टर (बुध्दीबळ), टेनिस ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तसेच पॅरालिम्पिक गेम्स, पॅरा एशियन गेम्स या क्रीडा स्पर्धांचा समावेश असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवणारे खेळाडू पात्र असतील.

            गट-ब (राजपत्रित) पदासाठी युवा/कनिष्ठ गटातील जागतिक चॅम्पियनशीप, एशियन चॅम्पियनशीप/कप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप/कप, युथ ऑलिम्पिक /एशियन/कॉमनवेल्थ गेम्स, आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित जागतिक तसेच आशियाई शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त 19 वर्षाखालील गट मुले/मुली), जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुध्दीबळ), पॅरा जागतिक / एशियन /कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप या स्पर्धांतील पदकप्राप्त खेळाडू पात्र असतील

सुधारित धोरणात क्रीडा ई-प्रमाण स्वयंचलित डिजिटल कार्यप्रणालीमुळे लागू

 सुधारित धोरणात क्रीडा ई-प्रमाण स्वयंचलित डिजिटल कार्यप्रणालीमुळे लागू करण्यात येत  आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्रांना चाप बसणार आहे. या प्रणालीत स्पर्धा संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत निकाल डिजिटल स्वाक्षरीने अपलोड करणे बंधनकारक होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डेटा कायमस्वरुपी जतन करण्यात येत असून त्यात कोणताही फेरफार करणे शक्य नसून ऑटोमेटेड क्रिप्टोग्राफिक हॅशद्वारे तत्काळ सत्यता पडताळणी होणार आहे.

            नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत धोरणात सुसूत्रता व एकसंधता आणण्यासाठी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले असून एकत्रित सुधारित धोरणासंबंधीचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. यापूर्वीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आरक्षणाकरिता पात्र होत असलेल्या खेळाडू उमेदवारांना देखील सुधारित शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणे आवश्यक राहील.

ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ आणि स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, बुद्धीबळ, मल्लखांब व क्रिकेट हे देशी खेळ आरक्षणासाठी पात्र

 ऑलिम्पिक (समर) स्पर्धांमधील 2005 नंतर सलग तीन ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ आणि स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, बुद्धीबळ, मल्लखांब व क्रिकेट हे देशी खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. त्याचबरोबर पात्र खेळांची अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, पॅरालिम्पिक एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांना लागू राहणार नाही. ज्या-ज्या वर्षी ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, पॅरालिम्पिक एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स होतील त्या-त्या वर्षात या स्पर्धांमध्ये आयोजित होणारे खेळ आरक्षणासाठी पात्र राहतील.

            मान्यताप्राप्त संघटनांमार्फत आयोजित होणा-या स्पर्धांसाठी वरिष्ठ, युवा व कनिष्ठ वयोगटातील खेळाडू आरक्षणासाठी पात्र असतील. शालेय (19 वर्षाखालील वयोगट) व खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमधील युथ, युनिव्हर्सिटी आणि पॅरा गेम्समधील खेळ, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमधील खेळ पात्र ठरतील. 

            या सुधारित धोरणात क्रीडा ई-प्रमाण स्वयंचलित डिजिटल कार्यप्रणालीमुळे लागू करण्यात येत  आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्रांना चाप बसणार आहे. या प्रणालीत स्पर्धा संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत निकाल डिजिटल स्वाक्षरीने अपलोड करणे बंधनकारक होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डेटा कायमस्वरुपी जतन करण्यात येत असून त्यात कोणताही फेरफार करणे शक्य नसून ऑटोमेटेड क्रिप्टोग्राफिक हॅशद्वारे तत्काळ सत्यता पडताळणी होणार आहे.

ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान देण्यास मंजुरी

 ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान देण्यास मंजुरी

            ऑरिक सिटी शेंद्रा (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 अंतर्गत विशेष बाब म्हणून भांडवली अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांनी सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत इलेस्टोमेरिक यार्न्स (स्पॅन्डेक्स) निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या उद्योगाने या विभागात उभा केलेला हा पहिला प्रकल्प असल्यामुळे 500 कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या अनुषंगाने 5 टक्के आणि त्यापुढील 500 कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीवर पुन्हा 5 टक्के अनुदान देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यात एक विशाल प्रकल्प म्हणून उद्योगाने केलेली गुंतवणूक व रोजगार निर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने त्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 अंतर्गत अनुदान देण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीला अनुसरून विशेष बाब म्हणून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

*****

Featured post

Lakshvedhi