वाढत्या सायबर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि उद्योगांना डिजिटल सुरक्षितता मजबूत करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना उपलब्ध करून देणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता. चर्चासत्रात सहभागी मान्यवरांना संबोधताना डॉ. सी. पी. जॉन्सन म्हणाले, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सी-डॅकला संशोधन व विकास क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळाचा वारसा आहे. उच्च कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल गव्हर्नन्स, आरोग्यसेवा, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि शिक्षण अशा धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांत सी-डॅकचे योगदान आहे. भक्कम सायबर परिसंस्था उभारण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सातत्यपूर्ण जागरूकता, सज्जता आणि सहकार्य आवश्यक आहे, असे डॉ. जॉन्सन यांनी नमूद केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 August 2026
सायबर सुरक्षेबाबत उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला
सायबर सुरक्षेबाबत उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला
- डॉ. सी. पी. जॉन्सन
एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईतर्फे एमएसएमईंसाठी सायबर सुरक्षाविषयक चर्चासत्र
मुंबई, दि. १ : सायबर सुरक्षेबाबत उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला, असे प्रतिपादन सी-डॅक मुंबईचे वरिष्ठ संचालक डॉ. सी. पी. जॉन्सन यांनी केले. एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसएमईंसाठी सायबर सुरक्षा बळकट करणे या विषयावर ३१ जुलै रोजी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अपघातग्रस्त, हृदयरुग्ण, माता-बालक तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक स्तरावरच अधिक गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अधिक सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे.
याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेली होती. ज्या आरोग्य संस्थांची 80 टक्क्यांहून अधिक बांधकामे झाली आहेत त्यांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. पूर्णत्वास येत असलेल्या उर्वरित आरोग्य संस्थांचेही "आरोग्य संवाद" यात्रेदरम्यान लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होत असलेले हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देणारे ठरणार असून, "सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा" हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास आली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आली असुन सर्व संस्था कार्यान्वित होण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.
राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा
राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा विविध आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम, धुळे, आदी ठिकाणांवरील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत. तसेच चंद्रपूर, धुळे, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, बुलढाणा, आणि सोलापूर येथील विविध आरोग्य प्रकल्पही नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. या प्रकल्पांमध्ये आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेली होती. ज्या आरोग्य संस्थांची 80 टक्क्यांहून अधिक बांधकामे झाली आहेत त्यांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. पूर्णत्वास येत असलेल्या उर्वरित आरोग्य संस्थांचेही "आरोग्य संवाद" यात्रेदरम्यान लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होत असलेले हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देणारे ठरणार असून, "सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा" हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास आली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आली असुन सर्व संस्था कार्यान्वित होण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...