Sunday, 2 August 2026

राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेली होती. ज्या आरोग्य संस्थांची 80 टक्क्यांहून अधिक बांधकामे झाली आहेत त्यांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला.  त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत.  पूर्णत्वास येत असलेल्या उर्वरित  आरोग्य संस्थांचेही  "आरोग्य संवाद" यात्रेदरम्यान लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होत असलेले हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देणारे ठरणार असून, "सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा" हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi