राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून, नियमानुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. कृषी पंपांच्या फीडरवर असलेल्या घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष डिझाइनचे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसविण्यात येत आहेत. या व्यवस्थेमुळे कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीजपुरवठा आणि घरगुती ग्राहकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध राहते. काही ठिकाणी सिंगल फेजिंगसारख्या तांत्रिक अडचणी असल्या तरी त्याचे निराकरण केले जात आहे. तांत्रिक अडचणी विहित कालावधीत न सोडविल्यास यासाठी मुख्य अभियंत्यांना थेट जबाबदार धरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 22 July 2026
जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे
जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे
-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. २१:- जालना जिल्ह्यातील शेतकरी, घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि उद्योगांना पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून आवश्यकतेनुसार वाढीव मागणीची गरज लक्षात घेऊन नवीन डीपीआर तयार करावा, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
जालना जिल्ह्यातील ऊर्जा विभागातील प्रलंबित प्रश्नाचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला. या बैठकीस आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढान, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार नारायण केचे व आमदार संतोष दानवे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
समग्र शिक्षा अभियान, पीएम-श्री योजना
समग्र शिक्षा अभियान, पीएम-श्री योजना तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियानांतर्गत सुरू असलेल्या वसतिगृह बांधकामे, शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली उभारणी आणि इतर विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे निश्चित वेळेत पूर्ण करताना गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.
पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या प्रकल्पाचा
पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या प्रकल्पाचा आढावा घेऊन, सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत राहतील अशा एकात्मिक संकुलासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने शुल्क कमी करून ते टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी
सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने शुल्क कमी करून ते टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे संगत मंत्री भुसे म्हणाले, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रमाचा समावेश करावा.
शालेय शिक्षण विभागाकडील बांधकाम प्रकल्पांना गती,कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा
शालेय शिक्षण विभागाकडील बांधकाम प्रकल्पांना गती
-शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
· कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा
मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध योजनांमधील बांधकाम प्रकल्पांना गती देत ते गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाकडील पुणे येथील शिक्षण आयुक्तालय इमारत, सातारा सैनिकी शाळा, समग्र शिक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना तसेच बालभारती अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.
सातारा सैनिकी शाळेच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण, सुरू व प्रस्तावित विकासकामांसह क्रीडांगण, क्रीडा संकुल आदी सुविधांच्या प्रकल्पांचा घेताना मंत्री भुसे म्हणाले, सातारा सैनिकी शाळा ही महाराष्ट्राची मानबिंदू संस्था आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण काराव्यात. राज्यातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित उपक्रम जिल्हानिहाय राबविण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सैनिकी शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
Tuesday, 21 July 2026
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रूपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते,पार्किंग, बगीचे,फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...