Saturday, 4 July 2026

सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार

 सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सुमारे ९.६६० कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होईल. सहा प्रवेश आणि निर्गमन मार्गांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, ५२, १६६ आणि १५० यांच्यात अखंड संपर्क प्रस्थापित होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रादेशिक संपर्कक्षमता वाढून सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार आहे.

सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार

 सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सुमारे ९.६६० कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होईल. सहा प्रवेश आणि निर्गमन मार्गांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, ५२, १६६ आणि १५० यांच्यात अखंड संपर्क प्रस्थापित होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रादेशिक संपर्कक्षमता वाढून सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार आहे.

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार

 सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय काढण्यात येणार

 

मुंबई, दि. ३ : राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणामुळे सोलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे. १,०२०.५० कोटी रुपयांच्या चार पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन सोलापूर शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

            विधानभवन येथे सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, रेल्वे, बीएसएनएल आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहनpl share

  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी

अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

  मुंबई, दि. 3 : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते. यासाठी पात्र लाभार्थीना 1 ते 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 

या योजनेसाठी लाभार्थींची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. लाभार्थीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यांची वयोमर्यादा 40 वर्षे आहे. कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्षे असावे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील. ते केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसावे. कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.

 

अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पति-पत्नी एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक पासबूक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास) राज्य व केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) यासह विविध पुरावे, आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

००००

गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार 'व्हॉट्सॲप' चॅनल आणि 'पब्लिक ॲप' वर!

 गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार

 'व्हॉट्सॲप' चॅनल आणि 'पब्लिक ॲप' वर!

 

            मुंबई, दि.4: समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे नागरिकांपर्यंत अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता 'व्हॉट्सॲप' चॅनल आणि 'पब्लिक' ॲप  वर अधिकृत, प्रमाणित खाती सुरू केली आहेत.

आता नागरिक 'व्हॉट्सॲप' चॅनलवर DGIPR, Govt of Maharashtra या नावाने, तर पब्लिक ॲपवर महाराष्ट्र शासन (@mahadgipr) या नावाने शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स मिळवू शकतील. या दोन्ही प्लॅटफॉर्म्समुळे जनतेपर्यंत अधिक गतीने, अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती थेट आणि व्यापक स्वरूपात  पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालय पार पाडत असते. हे काम करताना डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणून महासंचालनालयाने हायपरलोकल कंटेंट देणाऱ्या 'पब्लिक ॲप' वर आणि 'व्हॉट्सॲप चॅनल' वर आपली उपस्थिती नोंदवली आहे.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अपडेट्स हवे आहेत? मग खालील लिंक्सवर क्लिक करून आजच जॉईन व्हा

व्हॉट्सॲप चॅनल:

https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I

पब्लिक ॲप:

https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1

महासंवाद:

https://mahasamvad.in/

एक्स (ट्विटर):

https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक:

https://www.facebook.com/MahaDGIPR

इन्स्टाग्राम:

https://www.instagram.com/mahadgipr

युट्यूब:

https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

टेलिग्राम:

https://t.me/MahaDGIPR

डेलिहंट:

https://profile.dailyhunt.in/mahasamvad

अफवांवर विश्वास ठेवू नका! शासनाच्या अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी वरील चॅनेल्सना नक्की फॉलो करा


4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

 4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

 

मुंबई, दि 3 : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

 

बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 1916

पालघर हेल्पलाईन क्रमांक - 02525 297474, +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 022-25364779, 0222530 1740,

    91 93723 38827,

ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष - 1800-222-108/8657887101

पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 02227458040/41/42


दिव्यांगजनों के सशक्तिकरण को सर्वोच्च प्राथमिकता दी है। वर्ष 2016 में पारित दिव्यांगजन

 राज्यपाल ने कहा कि माननीय प्रधानमंत्री ने दिव्यांगजनों के सशक्तिकरण को सर्वोच्च प्राथमिकता दी है। वर्ष 2016 में पारित दिव्यांगजन अधिकार अधिनियम ने विभिन्न प्रकार की दिव्यांगताओं से ग्रसित नागरिकों को उनके अधिकारों की प्रभावी कानूनी सुरक्षा प्रदान की है। उन्होंने बताया कि देश में लगभग 2.68 करोड़ तथा महाराष्ट्र में लगभग 30 लाख दिव्यांगजन हैं। राज्य सरकार द्वारा स्वरोजगार, पुनर्वास, सामाजिक सुरक्षा तथा 'सुगम' पोर्टल के माध्यम से दिव्यांगजनों के कल्याण के लिए अनेक उपयोगी पहल की जा रही हैं। उन्होंने कहा कि दिव्यांगजनों का समावेशी विकास केवल सरकार की ही नहीं, बल्कि पूरे समाज की नैतिक जिम्मेदारी है।

Featured post

Lakshvedhi