Friday, 22 May 2026

समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

 समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

 

राजा राममोहन रॉय हे भारतीय पुनर्जागरणाचे अग्रदूत मानले जातात. आधुनिक भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणांचा पाया घालणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाची जयंती म्हणजे समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस होय.एकोणिसाव्या शतकात त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाज सुधारणांसाठी केलेले प्रयत्न,त्यासाठी उभारलेला सनदशीर लढा आणि कायद्याची मदत घेऊन केलेल्या समाजसुधारणा आजही प्रेरणादायी आहेत.

त्यांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या संक्रमणकाळात भारतीय समाजाला नव्या विचारांची दिशा दिली. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजात आधुनिकतेची पहाट उगवली. राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे झाला. त्यांचे वडील रामकांत रॉय आणि आई तारिणी देवी हे धार्मिक वृत्तीचे होते. बालपणापासूनच त्यांना संस्कृत, फारसी, अरबी, बंगाली आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान प्राप्त झाले. विविध धर्मग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. वेद, उपनिषदे, कुराण आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी मानवतेचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला. त्यांचा उत्कर्ष हा भारतातील सामाजिक आणि वैचारिक संक्रमणाच्या काळात झाला.

त्या काळात भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. इंग्रजांचे राजकीय वर्चस्व वाढत असताना भारतीय समाज मात्र अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि कालबाह्य चालीरीतींमध्ये अडकलेला होता. स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. सतीप्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व, स्त्रीशिक्षणावरील बंदी, विधवांचा होणारा छळ, जातिभेद आणि अस्पृश्यता या सामाजिक विकृतींनी समाज पोखरला होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांडांना अधिक महत्त्व आले होते. समाजात विवेकापेक्षा अंधश्रद्धेचे वर्चस्व वाढले होते

अपघातग्रस्तांना पहिल्या सात दिवसांसाठी आणि दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध

 अपघातग्रस्तांना पहिल्या सात दिवसांसाठी आणि दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. अपघात झाल्यास ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका आणि जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकणार आहे. ईडीएआर आणि टिएमएस २.० या डिजिटल प्रणालींशी योजना जोडण्यात आल्याने उपचार प्रक्रिया आणि निधी वितरण अधिक वेगाने होणार आहे. विमाधारक प्रकरणांत विमा कंपन्या खर्च उचलणार असून, ‘हिट अँड रनकिंवा विमाविना प्रकरणांमध्ये शासन खर्च करणार आहे.

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी “दुचाकीस्वार व पादचारी वाचवा अभियान २०२६” ही विशेष मोहीम

 रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी दुचाकीस्वार व पादचारी वाचवा अभियान २०२६ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्वाधिक दुचाकी अपघात होणाऱ्या ११० रस्त्यांवर हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या राहवीरकिंवा जीवनदूतव्यक्तींना केंद्र शासनामार्फत २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मोफत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पीएम राहत (प्राईम मिनीस्टररोड ॲक्सीडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्यूरड ‍ट्रिटमेंट योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.

आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती

 राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा जोडरस्त्यांवर सुमारे २५ हजार किलोमीटर लांबीच्या मार्गांवर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली मागील वर्षभरापासून कार्यरत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये मदत मिळावी यासाठी तातडीच्या प्रतिसादाचा कालावधी ३० मिनिटांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन तपासणी व वाहनचालक चाचण्या कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पारदर्शक पद्धतीने घेतल्या जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन शालेय बस नियमावली तयार करण्यात आली असून, स्थानिक स्तरावर अपघातप्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांमार्फत

 १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध २ लाख ६४ हजार ६७२ प्रकरणे नोंदविण्यात आली, तर मागील आसनावरील हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांविरुद्ध ३० हजार ५६८ कारवाया करण्यात आल्या. अतिवेगामुळे २२ हजार ३६०, सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध १८ हजार १७२, अवैध पीयूसी प्रकरणांत १८ हजार ९४० आणि विमाविना वाहन चालविणाऱ्या १५ हजार ६३८ चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास आणि फिटनेस नसलेल्या वाहनांविरुद्धही मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहनांची तांत्रिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यात ५३ शासकीय आणि १६ खासगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएस) सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कुशल वाहनचालकांनाच परवाने मिळावेत यासाठी २०२६ मध्ये ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटी) सुरू करण्यात येत आहेत.

जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणावर

 १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध २ लाख ६४ हजार ६७२ प्रकरणे नोंदविण्यात आली, तर मागील आसनावरील हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांविरुद्ध ३० हजार ५६८ कारवाया करण्यात आल्या. अतिवेगामुळे २२ हजार ३६०, सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध १८ हजार १७२, अवैध पीयूसी प्रकरणांत १८ हजार ९४० आणि विमाविना वाहन चालविणाऱ्या १५ हजार ६३८ चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास आणि फिटनेस नसलेल्या वाहनांविरुद्धही मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन

 अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटसुधारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच राज्यभरात रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी रडार आणि इंटरसेप्टर वाहनांच्या सहाय्याने ३३२ विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi