रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी “दुचाकीस्वार व पादचारी वाचवा अभियान २०२६” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्वाधिक दुचाकी अपघात होणाऱ्या ११० रस्त्यांवर हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘राहवीर’ किंवा ‘जीवनदूत’ व्यक्तींना केंद्र शासनामार्फत २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मोफत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी “पीएम राहत” (प्राईम मिनीस्टर – रोड ॲक्सीडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्यूरड ट्रिटमेंट योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment