Friday, 15 May 2026

जेजुरीचा ‘भंडारा’ आता कायद्याच्या चौकटीत; भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

 जेजुरीचा ‘भंडारा’ आता कायद्याच्या चौकटीत;

  • भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

 

मुंबई,दि. १४ : जेजुरी गडकोटातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला आणि भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. अन्न व औषध प्रशासन लवकरच जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित करणार आहे, जे पारदर्शकता आणि शुद्धतेला प्राधान्य देईल. भाविकांच्या आरोग्यासाठी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले आहेत.

जेजुरी गडकोटावर भंडारा उधळून आग लागल्याची घटना काही काळापूर्वी घडली होती. लोकप्रतिनिधींनी या घटनेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भंडाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी विशेष धोरण ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे, आमदार राजू नवघरे, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

विविध देवस्थानांच्या ठिकाणी  विकला जाणारा  ‘हळद भंडारा’ शुद्ध हळदीच्या स्वरूपातच उपलब्ध असावा, तसेच विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार अन्न परवाना घेऊनच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले जात आहेत. यामुळे भेसळयुक्त  ‘हळद भंडारा’ विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने खालील उपाययोजना करण्याचे ठरवले आहे:

सुरक्षितता उपाययोजना: मंदिर परिसरात भंडाऱ्याच्या वापराबाबत सुरक्षिततेचे नियम लागू करणे.

जनजागृती: भाविकांना शुद्ध भंडाऱ्याची ओळख व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीफलक लावणे.

आरोग्य मोहीम: आरोग्य विभागाद्वारे भंडाऱ्याच्या वापराबाबत आणि गुणवत्तेबाबत विशेष तपासणी मोहीम राबविणे.

कायदेशीर दृष्टिकोनातून भंडाऱ्याचे वर्गीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सामान्यतः  ‘ भंडारा’’ म्हणजे मोफत अन्न वितरण, परंतु जेजुरीत तो ‘हळद भंडारा’ या स्वरूपात पूजेसाठी वापरला जातो. जर हळदीचा वापर सौंदर्यवाढ किंवा उपचारासाठी केला जात असेल, तर तो औषध किंवा सौंदर्यप्रसाधन यामध्ये येतो, परंतु जेजुरीतला हळद भंडारा’ ‘धार्मिक विधी’ आणि ‘प्रसाद’ म्हणून वापरला जातो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन त्याचे विशेष नियमन करणार आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले, जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या निर्णयामुळे जेजुरीतील भंडाऱ्याला कायदेशीर ओळख मिळणार असून, देवस्थानांच्या ठिकाणी भेसळ रोखण्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

000


 


‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये १०० हून अधिक हवामान

 मुंबई क्लायमेट वीक २०२६मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उष्णतेशी मुकाबला करणाऱ्या उपाययोजना, सौर ऊर्जा, पुनरुत्पादक शेती, कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र, शहरी जंगल, कूल रूफ्स, हवामान अर्थसंकल्प यांसारख्या संकल्पनांना विशेष प्रतिसाद मिळाला.

 

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंजमध्ये ग्लोबल साऊथमधील ३५० हून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला. ऊर्जा, पाणी, शेती, कचरा व्यवस्थापन आणि हवामान डेटा या क्षेत्रांतील ३४ अंतिम स्पर्धकांमधून आठ विजेते निवडण्यात आले. या उपक्रमात माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.

 

प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, ‘मुंबई क्लायमेट वीक २०२७मध्ये नागरिकांचा अधिक व्यापक सहभाग, जनजागृती आणि स्थानिक स्तरावरील हवामान कृतीवर भर दिला जाणार आहे. हवामान बदलावर चर्चा करण्यापासून प्रत्यक्ष उपाययोजनांकडे वाटचाल करणे हेच या उपक्रमाचे मुख्य

स्वयंपूर्ण कॅम्पस म्हणून संकल्पित, आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र

 स्वयंपूर्ण कॅम्पस म्हणून संकल्पित, आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र (एआयआयडीझेड) मध्ये कमर्शियल टॉवर, कॉन्फरन्स सेंटर आणि हॅबिटॅट ब्लॉक यासह अनेक सुविधा एकत्रित केल्या आहेत. आफ्रिकन आणि भारतीय व्यवसाय, सरकारे आणि भागधारक यांच्यात अखंड संवाद आणि करारांसाठी हे संकल्पित केले आहे. व्यवसाय, व्यापार कार्यालये आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व यांना भरभराट होण्यासाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या एकात्मिक सुविधांमध्ये 2,50,000 चौ. फूट प्रदर्शन जागा, बैठक कक्ष आणि 54 आफ्रिकन देशांसाठी तसेच भारतीय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांसाठी कायमस्वरूपी कार्यालये यांचा समावेश आहे. व्यवसाय आणि भागधारकांसाठी वेळ, खर्च आणि गुंतागुंत कमी करताना वाढ, विशेषीकरण आणि विस्तारासाठी हे उत्प्रेरक म्हणून काम करेल. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि चीनमधील सीएईटीईसारख्या जागतिक मानकांचे अनुकरण करून, एआयबीसी आफ्रिका-भारत व्यापार आणि वाणिज्यासाठी एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. याचा जीडीपी आणि आर्थिक विकासावर लक्षणीय परिणाम होण्याचा अंदाज आहे.

स्वयंपूर्ण कॅम्पस म्हणून संकल्पित, आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र

 स्वयंपूर्ण कॅम्पस म्हणून संकल्पित, आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र (एआयआयडीझेड) मध्ये कमर्शियल टॉवर, कॉन्फरन्स सेंटर आणि हॅबिटॅट ब्लॉक यासह अनेक सुविधा एकत्रित केल्या आहेत. आफ्रिकन आणि भारतीय व्यवसाय, सरकारे आणि भागधारक यांच्यात अखंड संवाद आणि करारांसाठी हे संकल्पित केले आहे. व्यवसाय, व्यापार कार्यालये आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व यांना भरभराट होण्यासाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या एकात्मिक सुविधांमध्ये 2,50,000 चौ. फूट प्रदर्शन जागा, बैठक कक्ष आणि 54 आफ्रिकन देशांसाठी तसेच भारतीय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांसाठी कायमस्वरूपी कार्यालये यांचा समावेश आहे. व्यवसाय आणि भागधारकांसाठी वेळ, खर्च आणि गुंतागुंत कमी करताना वाढ, विशेषीकरण आणि विस्तारासाठी हे उत्प्रेरक म्हणून काम करेल. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि चीनमधील सीएईटीईसारख्या जागतिक मानकांचे अनुकरण करून, एआयबीसी आफ्रिका-भारत व्यापार आणि वाणिज्यासाठी एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. याचा जीडीपी आणि आर्थिक विकासावर लक्षणीय परिणाम होण्याचा अंदाज आहे.

, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता संधी तसेच रोजगार निर्मिती

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता संधी तसेच रोजगार  निर्मिती आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करून आफ्रिका भारत व्यापार केंद्र हे आर्थिक प्रगतीकरिता प्रेरक ठरेल. भारत व आफ्रिकन देशांदरम्यान शाश्वत संबंध प्रस्थापित करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देत, दीर्घकालीन भागीदारीला प्रोत्साहन मिळून मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देईल.

 

            विजय सिंघल म्हणाले की, आफ्रिका भारत व्यापार केंद्र या धोरणात्मक प्रकल्पाद्वार भारत-आफ्रिका संबंधांना चालना मिळणार आहे. कल्पना, नवोपक्रम आणि मानवी भांडवल यांचे एकात्मिकरण करून एआयबीसी हे परस्पर वाढीकरिता पूरक परिसंस्था निर्माण करेल. ग्लोबल साऊथचे प्रवेशाद्वारे म्हणून महाराष्ट्र एआयबीसीमार्फत आफ्रिकेच्या विकासातील विश्वसनीय भागीदार म्हणून भारताचे स्थान नव्याने अधोरेखित करण्यासह भविष्यातील भागीदारी आणि संधी साकार करेल.

 

खारघर येथील प्रस्तावित आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हे जागतिक व्यापार

 उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खारघर येथील प्रस्तावित आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हे जागतिक व्यापार संबंधांना सहाय्यभूत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याकरिता महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पातील एकात्मिक सुविधा आणि मुंबई महानगर प्रदेशातील मोक्याचे स्थान यामुळे हितसंबंधी यादरम्यान अखंड आदान-प्रदान प्रस्थापित होऊन व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक उपक्रमांकरिता हा प्रकल्प प्रेरक ठरेल. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता पसंतीचे ठिकाण म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक उंचावणार आहे.

 

सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील

    सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे एकात्मिक केंद्र म्हणून हा प्रकल्प संकल्पित आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक भागीदारी यांना चालना देण्याच्या उद्देशाने आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांच्या सहयोगाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. ग्लोबल साउथ देशांमधील सहाकार्याकरिता भारताचे नेतृत्व मान्य होत असताना, भारत-आफ्रिकेतील सध्याच्या 96 अब्ज अमेरिकन डॉलर भागीदारीच्या क्षमता अधिक वाढीस लागाव्या याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

 

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आफ्रिका भारत व्यापार केंद्र हा परिवर्तन घडवून आणणारा प्रकल्प असून याद्वारे भारत-आफ्रिका संबंधांचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र उदयास येणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक सहयोग यांकरिता समर्पित परिसंस्था निर्माण करण्यासह या प्रकल्पाद्वारे आफ्रिकन देशांबरोबरचे आर्थिक संबंध बळकट होऊन विकास, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीकरिता नवीन संधी खुल्या होणार आहेत.  जागतिक पटलावर महाराष्ट्राला मानाचे स्थान प्राप्त होण्यासह ग्लोबल साउथमधील भारताच्या विस्तारणाऱ्या भूमिकेकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे.

 

Featured post

Lakshvedhi