‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उष्णतेशी मुकाबला करणाऱ्या उपाययोजना, सौर ऊर्जा, पुनरुत्पादक शेती, कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र, शहरी जंगल, कूल रूफ्स, हवामान अर्थसंकल्प यांसारख्या संकल्पनांना विशेष प्रतिसाद मिळाला.
‘मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये ग्लोबल साऊथमधील ३५० हून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला. ऊर्जा, पाणी, शेती, कचरा व्यवस्थापन आणि हवामान डेटा या क्षेत्रांतील ३४ अंतिम स्पर्धकांमधून आठ विजेते निवडण्यात आले. या उपक्रमात माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.
प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, ‘मुंबई क्लायमेट वीक २०२७’मध्ये नागरिकांचा अधिक व्यापक सहभाग, जनजागृती आणि स्थानिक स्तरावरील हवामान कृतीवर भर दिला जाणार आहे. हवामान बदलावर चर्चा करण्यापासून प्रत्यक्ष उपाययोजनांकडे वाटचाल करणे हेच या उपक्रमाचे मुख्य
No comments:
Post a Comment