Sunday, 10 May 2026

शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणिराज्य सार्वजनिक उपक्रमांचे

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणिराज्य सार्वजनिक उपक्रमांचे सहकार्य लाभत आहे. इंडियन ऑइलच्या या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सरकारी रुग्णालयातच उपलब्ध होतील. लवकर निदान आणि वेळेत उपचार यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.

 

      या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्यांसाठी जाण्याची गरज कमी होणार असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. श्वसनविकारांच्या उपचारामध्ये ही सुविधा महत्त्वाची ठरणार असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी सीएसआर भागीदारीचे हे एक प्रभावी उदाहरण मानले जात आहे.

सर जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसविकार विभागामध्ये दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया

 सर जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसविकार विभागामध्ये दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया केल्या जातात. क्षयरोगविशेषतः औषध-प्रतिरोधक क्षयरोगफुफ्फुसाचा कर्करोगइंटरस्टिशियल लंग डिसीज आणि श्वसनमार्गातील अडथळे यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्रजुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे वेळेवर आणि अचूक निदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने सीएसआरच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून दिली असून त्यामुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे श्वसनविकारांचे अचूक आणि जलद निदान शक्य होईलतसेच गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यास मदत मिळणार आहे.

इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली

 इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार

अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून श्वसनविकारांच्या निदानाला मिळणार गती

 

        मुंबईदि. 8 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या  सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील सर जे.जे.हॉस्पीटी येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

 

      सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हजार

 प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हजार कामे पूर्ण झाली असून त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. तसेच पाणलोट विकास घटकांतर्गत ५७ अमृत सरोवर तयार करण्यात येत असून १५ जूनपर्यंत ३१ अमृत सरोवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विभागाच्या पाच वर्षाच्या बृहद आराखड्याअंतर्गत राज्यातील २७ हजार ९४२ सूक्ष्म पाणलोटांमध्ये १ लाख २१ हजार ५८३ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर टँकरग्रस्त आणि भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये प्राधान्याने कामे हाती

 एल निनोच्या पार्श्वभूमीवर टँकरग्रस्त आणि भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये प्राधान्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच विविध योजनाअंतर्गत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत १५ लाख १५ हजार कामांपैकी १२ लाख २७ हजार संरचनांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी झाली आहे.गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत यावर्षी १४३५ जलसाठ्यातून ४७७.७३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे ३०८३५ सघमी पाणीसाठा पुनर्स्थापित झाला असून ७३ हजार ४१७ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. या वर्षी १५ जून पर्यंत जिल्हानिहाय गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर

 केंद्र शासनाच्या विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामाअंतर्गत नालाखोलीकरणची कामे करताना त्याठिकाणी पुन्हा गाळ होऊ नयेयासाठी नाल्याच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत वाढीव निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री यांना स्वतः भेटणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले

एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीएल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणजलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच जलयुक्त शिवार २.० अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तींच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे १५ मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील १० टक्के कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत.

 

Featured post

Lakshvedhi