Sunday, 10 May 2026

शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणिराज्य सार्वजनिक उपक्रमांचे

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणिराज्य सार्वजनिक उपक्रमांचे सहकार्य लाभत आहे. इंडियन ऑइलच्या या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सरकारी रुग्णालयातच उपलब्ध होतील. लवकर निदान आणि वेळेत उपचार यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.

 

      या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्यांसाठी जाण्याची गरज कमी होणार असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. श्वसनविकारांच्या उपचारामध्ये ही सुविधा महत्त्वाची ठरणार असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी सीएसआर भागीदारीचे हे एक प्रभावी उदाहरण मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi