Saturday, 9 May 2026

विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

 विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञानसंस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी टेक वारीची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले कीवारीमध्ये जशी शिस्तसातत्यअध्यात्म आणि सामूहिकता आहेत्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असूनप्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजेअसे त्यांनी नमूद केले.

 

ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असूनहा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.

टेक वारी 2.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा

  

टेक वारी 2.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा

 – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 8 : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहेअसे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारकौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढासामान्य प्रशासन विभाग सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेसामान्य प्रशासन विभागाने टेक वारी 2.0च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असूनविविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले.

‘जन सेवा कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसमध्ये आधुनिक पायाभूत

 जन सेवा कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसमध्ये आधुनिक पायाभूत सुविधासुधारित ग्राहक सेवा तसेच अत्याधुनिक डिजिटल सेवा प्रणालीची उभारणी करण्यात आली आहे. १९३२-३३ मध्ये स्थापन झालेल्या अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिसला आधुनिक तंत्रज्ञानकार्यक्षम सेवा व्यवस्था आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेऊन नव्याने विकसित करण्यात आले आहे.

 

       पारंपरिक पोस्ट ऑफिसचे रूपांतर आधुनिकतंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित सेवा केंद्रांमध्ये करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

     कार्यक्रमादरम्यान अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिस परिसरात लोकार्पणस्मृतिफलक अनावरणतसेच आधार सेवा केंद्राची पाहणी करण्यात आली . त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष दृकश्राव्य सादरीकरण तसेच जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले .

 

पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला

 पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला

-केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

 

         केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले कीगाव असो वा शहरप्रत्येक कुटुंबाच्या मनामध्ये पोस्टमनबद्दल विशेष आत्मीयता आहे. देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांमार्फत सेवा देताना पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे. पोस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये दीड कोटी खाती आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून पोस्ट बँकेत ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून पोस्ट विभागाने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे.

 

       स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वारसा जपत पोस्ट विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री शिंदे यांनी २००७ साली राज्यमंत्री असताना पोस्टमनच्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केल्याची आठवण सांगितली. नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस’ संकल्पनेतून देशभरात सुमारे १०० पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले असून कॅफेवाय-फायइंटरनेटआरएफआयडीआधार सुविधा अशा विविध सेवा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जनसेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत देशभरात २५ हजार पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला

पोस्ट विभागाने आधार सेवा, बँकिंग सेवा, ऑटोमॅटिक पार्सल सेवा यांसारख्या

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वारसा आणि विकास’ या विचारातून पोस्ट विभागाने आधार सेवाबँकिंग सेवाऑटोमॅटिक पार्सल सेवा यांसारख्या आधुनिक सेवांचा स्वीकार केला आहे. इंटरनेटएसएमएस आणि ई-मेलसारख्या आधुनिक संदेशवहन साधनांमुळे पोस्ट विभागासमोर आव्हाने निर्माण झाली. खासगी कुरिअर सेवांमुळे स्पर्धाही वाढली. मात्र प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टीतून पोस्ट विभागाच्या सामर्थ्याला नवी दिशा मिळाली. पोस्ट बँकसारख्या सेवांमुळे विभागाने मोठे परिवर्तन साधले असून या परिवर्तनात केंद्रीय मंत्री शिंदे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

      पोस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा १६ टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल होताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पोस्टमन आणि पोस्ट विभागाचे समाजजीवनातील महत्त्व मराठीतील पु. ल. देशपांडे तसेच हिंदी लेखक शरद जोशी यांच्या साहित्यामधूनही अधोरेखित झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सामान्य माणसासाठी पोस्ट विभागाने मोठी कामगिरी बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

 पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•  पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक

•  ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पोस्ट ऑफिस जनतेच्या सेवेत दाखल

 

       मुंबईदि. ८  : गरीब-श्रीमंतजात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणारे पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले. पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदळणवळण तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण करण्यात आले.

 

    यावेळी आमदार अमित साटमआमदार हारून खानमहाराष्ट्र-गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह तसेच पोस्टमास्तर जनरल के. अरोरा आदी उपस्थित होते.

Friday, 8 May 2026

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी २० मे २०२६ पर्यंत

 ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

 

मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापिआधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.

 

या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी  २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi