Saturday, 9 May 2026

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

 पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•  पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक

•  ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पोस्ट ऑफिस जनतेच्या सेवेत दाखल

 

       मुंबई, दि. ८  : गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणारे पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले. पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दळणवळण तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण करण्यात आले.

 

    यावेळी आमदार अमित साटम, आमदार हारून खान, महाराष्ट्र-गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह तसेच पोस्टमास्तर जनरल के. अरोरा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi