विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक
-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘टेक वारी’ची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले की, वारीमध्ये जशी शिस्त, सातत्य, अध्यात्म आणि सामूहिकता आहे, त्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असून, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. ‘विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असून, हा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment