Saturday, 9 May 2026

टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

 टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात चार मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपी, नवीन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘टेक वारी’चे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कर्मयोगी भारत 2 एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi