Saturday, 9 May 2026

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

 पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•  पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक

•  ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पोस्ट ऑफिस जनतेच्या सेवेत दाखल

 

       मुंबईदि. ८  : गरीब-श्रीमंतजात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणारे पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले. पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदळणवळण तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण करण्यात आले.

 

    यावेळी आमदार अमित साटमआमदार हारून खानमहाराष्ट्र-गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह तसेच पोस्टमास्तर जनरल के. अरोरा आदी उपस्थित होते.

Friday, 8 May 2026

ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी २० मे २०२६ पर्यंत

 ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

 

मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापिआधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.

 

या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी  २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहरप्रशासकीय इमारतभाग-१चौथा मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग · विविध नृत्याविष्कार सादर

 टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग

·        विविध नृत्याविष्कार सादर

 

मुंबईदि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक-वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले.

 

दि. ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत  ‘टेक- वारी २.०’  अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. संध्या पुरेचा  संगीत नाटक अकादमीच्या टीमने संस्कृतीरंग  कार्यक्रम सादर करून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची दाद मिळवली. कार्यक्रमास  सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधामहाराष्ट्र सदन नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमलामुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मिनाक्षी अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमात गणेशवंदनशास्त्रीय संगीत नृत्यओडिसीभरतनाट्यमशिवस्तुतीबाल्या,  पंढरपूर वारी यासह विविध अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपराभावविश्व आणि कलात्मकता प्रभावीपणे उलगडण्यात आली.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हजार कामे पूर्ण झाली असून

 प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हजार कामे पूर्ण झाली असून त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. तसेच पाणलोट विकास घटकांतर्गत ५७ अमृत सरोवर तयार करण्यात येत असून १५ जूनपर्यंत ३१ अमृत सरोवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विभागाच्या पाच वर्षाच्या बृहद आराखड्याअंतर्गत राज्यातील २७ हजार ९४२ सूक्ष्म पाणलोटांमध्ये १ लाख २१ हजार ५८३ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर टँकरग्रस्त आणि भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये प्राधान्याने कामे

 एल निनोच्या पार्श्वभूमीवर टँकरग्रस्त आणि भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये प्राधान्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच विविध योजनाअंतर्गत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत १५ लाख १५ हजार कामांपैकी १२ लाख २७ हजार संरचनांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी झाली आहे.गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत यावर्षी १४३५ जलसाठ्यातून ४७७.७३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे ३०८३५ सघमी पाणीसाठा पुनर्स्थापित झाला असून ७३ हजार ४१७ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. या वर्षी १५ जून पर्यंत जिल्हानिहाय गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत मंजुरी दिलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच

 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले कीमृद व जलसंधारण विभागाच्या आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्याने आता कामास गती येईल. आतापर्यंत मंजुरी दिलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मूळ आराखड्यानुसारच कामे पूर्ण व्हावीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. मालगुजारी तलावांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्याची परवानगी मिळावी.

 

      सचिव पापळकर यांनी सांगितले कीजलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विशेष निधी व अभिसरणअंतर्गत आतापर्यंत गाव आराखड्याप्रमाणे १ लाख ४४ हजार ६९७ कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी १ लाख १० हजार १२० कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्वरित कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात

 केंद्र शासनाच्या विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामाअंतर्गत नालाखोलीकरणची कामे करताना त्याठिकाणी पुन्हा गाळ होऊ नयेयासाठी नाल्याच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत वाढीव निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री यांना स्वतः भेटणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi