मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी. गोराई भागात दिल्ली येथील भारत मंडपम च्या धर्तीवर ' कन्व्हेंन्शन सेंटर' निर्माण करण्याकरिता कार्यवाही करावी. यासाठी बृहत नियोजन आराखडा बनवावा. या केंद्राचा उपयोग व्यावसायिक स्तरावर होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 2 May 2026
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची आवश्यकता आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत येथील जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा करावा. दिघी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. मुंबई महापालिकेने शताब्दी आणि भगवती रुग्णालयामध्ये दर्जेदार रुग्णसेवेसाठी आधुनिक यंत्र सामुग्री, स्वच्छता आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी दिले.
हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे
हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बैठक
मुंबई, दि. २: मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासाची कामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा. विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा
देशाच्या इतिहासातील १६ वी जनगणना ही अत्यंत व्यापक आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जात असून, ती केवळ लोकसंख्येची मोजणी
मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त विश्वास शंकरवार तसेच पी साऊथ वॉर्डाचे सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आज कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत ‘स्व-जन गणना मोहिमे’चा शुभारंभ आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी स्वतः नोंदणी करून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहभाग नोंदवला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत
प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्स' तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.
कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!
मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार
मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड-अलिबाग,दि.01 (जिमाका) :- "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायर' ठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंक' संबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, एमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्स' तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.
‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन
‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन
मुंबई, दि. 1 : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा , शनिवार (2 मे) रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) (एमएसआरएलएम) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या (एसएचजी) उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शन 2 ते 14 मे दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असून, राज्यासह देशातील विविध भागांतील महिला उद्योजिकांची उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना येथे घेता येणार आहे.
या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 230, इतर राज्यांतील 66, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महिला गटांचे 68 तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 34 स्टॉल्स आहेत. याशिवाय नाबार्ड, माविम, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय विभागांचे 22 स्टॉल्स सहभागी झाले आहेत.
प्रदर्शनातील 80 स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून, राज्यातील विविध भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ येथे उपलब्ध असतील. तसेच हातमाग वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी लॉकर्सची व्यवस्था, 25 किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरी तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार असून, उमेद परिवारातील सुमारे 65 लाख सदस्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या ‘महालक्ष्मी सरस’मध्ये एआर फोटोग्राफी, अॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘कंटेनर’ ही मध्यवर्ती संकल्पना असून, उद्योग, निर्यात आणि जागतिक संधींचे प्रतीक म्हणून ‘उद्योग किल्ला’ उभारण्यात आला आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...