Saturday, 2 May 2026

मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

 मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

                      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रायगड-अलिबाग,दि.01 (जिमाका) :- "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंकहा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाहीतर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायरठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   

             या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंकसंबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.

             या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेरोजगार हमी मंत्री भरत गोगावलेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरखासदार सुनील तटकरेखासदार श्रीरंग बारणेगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरविभागीय आयुक्त रुबल अग्रवालविशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडेजिल्हाधिकारी किशन जावळेएमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेपोलीस अधीक्षक आंचल दलालसहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटीलएमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi