Saturday, 2 May 2026

हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे

 हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बैठक

 

मुंबई, दि. २: मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.  या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली.  बैठकीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासाची कामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा.  विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi