Tuesday, 7 April 2026

एलपीजी पुरवठा नियंत्रणात; डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन

 एलपीजी पुरवठा नियंत्रणातडिजिटल बुकिंगला प्रोत्साहन

शिधा नियंत्रक श्री.डांगे यांनी सांगितले की,  राज्यातील २३ बॉटलिंग प्लांट्समार्फत सुमारे २,२०० वितरक आणि ३.५ कोटी ग्राहकांना सेवा दिली जाते. घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज सरासरी ५.८२ लाख रिफिल वितरित केले जात आहेत. वितरण पारदर्शक करण्यासाठी डीएसी (Delivery Authentication Code) सक्तीचा करण्यात आला आहे.

ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारेच बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले असून सध्या ९५ टक्के बुकिंग ऑनलाईन होत आहेत. न्याय्य वितरणासाठी बुकिंग अंतराल निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना

 पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना

मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असलातरी राज्यातील पुरवठा सुरळीत असल्याचे सांगून अपर मुख्य सचिव डिग्गीकर म्हणाले की,  जिथे जिथे शक्य आहे तिथे पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाईप लाईन गॅस पुरवठा शक्य आहे. त्या ठिकाणी ३० जून पर्यंत पीएनजी बंधनकारक असून ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणा एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.  पीएनजी  कनेक्शन ज्या भागांमध्ये उपलब्ध तिथे त्याचा वापर वाढवायचा  असून ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता पीएनजी स्वस्त असून त्याचे  देशांतर्गत उत्पादन जास्त आहे. पीएनजी नेटवर्क जिथे पोहोचले आहे तिथे  तिथे ग्राहकांनी नोंदणी केली पाहिजे असे अपर मुख्य सचिव डिग्गीकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा; एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना

 राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;

एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना

-         अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

 

मुंबईदि. ६ : राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून महाराष्ट्रात एलपीजीपेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची  माहिती  अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे  अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव

 *हे ठरले प्रदर्शनाचे सरस’ विजेते

प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यात आला. यामध्ये खालील गटांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कार्याची मोहोर उमटवली. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

१. खाद्य विभाग केरळच्या एर्नाकुलम येथील नंदनम बचतगट’ (ज्यूस स्टॉल) याने प्रथम क्रमांक मिळवला.

 

२. महाराष्ट्रातील बेस्ट सेलिंग स्टॉलमध्ये नांदेडच्या समृद्धी समूहाने (मोरिंगा पावडर) राज्यात अव्वल स्थान पटकावले.

३. नाविन्यपूर्ण उत्पादनात जळगावच्या गोपाल कृष्ण समूह (मल्टीमिलेट खिचडी) आणि साताऱ्याच्या ज्ञानज्योती समूह (रोस्टेड भेळ) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर बाजी मारली.

४. शेतकरी उत्पादक कंपनीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील कोकण कन्या एफपीसी आणि भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील शिखर धारा एफपीसी या दोन्ही संस्थांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

५. इतर राज्यांतून पश्चिम बंगालच्या जीवनसाथी एस. जी. एस. वाय. गटाने (कपडे आणि स्कार्फ) सर्वाधिक विक्रीचा मान मिळवला.


महालक्ष्मी सरस खरेदीच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष ‘क्लॉक

 विशेष सेवांचे आकर्षण

खरेदीच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष क्लॉक रूम’ आणि विश्रांती कक्षाची सोय होती. कुटुंबीय खरेदी करत असताना ज्येष्ठांना येथे सुरक्षित बसता येत होतेया संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले.

पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कैकपटीने वाढला. २५ किमीच्या परिघात घराच्या दारापर्यंत साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी उमेदने यशस्वीपणे पेलली.

महालक्ष्मी सरससेलिब्रिटींची साथ अन् डिजिटल प्रतिसाद

  महालक्ष्मी सरस सेलिब्रिटींची साथ अन् डिजिटल प्रतिसाद

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच नामांकित कलाकारांनी हजेरी लावल्याने प्रदर्शनाचा दर्जा उंचावला. अनेक सेलिब्रिटींनी स्टॉल्सवर जाऊन महिलांशी गप्पा मारल्या आणि ‘व्होकल फॉर लोकल’चे महत्त्व पटवून देणारे रील्स’ सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील तरुण पिढीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित झाली.

२५ किलोमीटरपर्यंतच्या घरपोच सुविधेमु‌ळे प्रतिसाद

 २५ किलोमीटरपर्यंतच्या घरपोच सुविधेमु‌ळे प्रतिसाद

यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे ‘गेमचेंजर’ ठरले ते म्हणजे आयोजकांनी पुरवलेल्या नाविन्यपूर्ण सुविधा. २५ किलोमीटरच्या परिघात मोफत घरपोच सेवा देण्याचा निर्णय महत्वाचा ठरला. आमच्या हातात पिशव्यांचे ओझे नकोअसे म्हणणाऱ्या मुंबईकरांनी या सुविधेमुळे पोतीभर धान्यमसालेसेंद्रिय गुळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मनमुराद खरेदी केली. घरपोच सुविधेमुळे खरेदीचा वेग वाढला आणि उलाढालीने १० कोटींचा टप्पा ओलांडून थेट २२ कोटींवर झेप घेतली.

Featured post

Lakshvedhi