पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना
मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असला, तरी राज्यातील पुरवठा सुरळीत असल्याचे सांगून अपर मुख्य सचिव डिग्गीकर म्हणाले की, जिथे जिथे शक्य आहे तिथे पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाईप लाईन गॅस पुरवठा शक्य आहे. त्या ठिकाणी ३० जून पर्यंत पीएनजी बंधनकारक असून ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणा एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे. पीएनजी कनेक्शन ज्या भागांमध्ये उपलब्ध तिथे त्याचा वापर वाढवायचा असून ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता पीएनजी स्वस्त असून त्याचे देशांतर्गत उत्पादन जास्त आहे. पीएनजी नेटवर्क जिथे पोहोचले आहे तिथे तिथे ग्राहकांनी नोंदणी केली पाहिजे असे अपर मुख्य सचिव डिग्गीकर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment